'ISIS'ला पुरवले जाणारे अंमली पदार्थ ठाण्यातून जप्त, ४ जणांना अटक

'ISIS'ला पुरवले जाणारे अंमली पदार्थ ठाण्यातून जप्त,  ४ जणांना अटक

जागतिक बंदी असलेल्या ISIS या दहशतवादी संघटनेला पुरवले जाणारे अंमली पदार्थ ठाण्यातून जप्त करण्यात आलेत.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : जागतिक बंदी असलेल्या ISIS या दहशतवादी संघटनेला पुरवले जाणारे अंमली पदार्थ ठाण्यातून जप्त करण्यात आलेत. ठाणे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केलीये. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठाही जप्त केला गेलाय.

हल्ल्यात जखमी झाले की ISIS चे दहशतवादी हे अंमली पदार्थ वापरतात हे अंमली पदार्थ इंदुरहून ठाण्यात आले होते आणि इथून ते पुढे परदेशात जिथे ISIS हा दहशतवादी संघटना सक्रिय आहे तिथे हे अंमली पदार्थ तस्करी केली जाणार होते का? याचा तपास ठाणे पोलीस करतायेत.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील या अंमली पदार्थावर बंदी आणली होती. मात्र आता ठाणे या अंमली पदार्थाचे हब बनलय का? ISIS चे ठाणे कनेक्शन अनेकदा समोर आलेत त्यात आता अशा पद्धतीने अंमली पदार्थांचा दहशतवाद समोर आल्याने पोलीस या घटनेची गंभीरतेने चौकशी करत आहेत.

ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ४ जणांना अटक केलीये. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणारेये. या ४ आरोपींकडून ठाणे पोलिसांनी तब्बल १० हजार अंमली पदार्थांच्या स्ट्रीप जप्त केल्या आहेत.

आतापर्यंत कुठे-कुठे वापरलं गेलं तुमचं आधार कार्ड, असं घ्या जाणून

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 02:19 PM IST

ताज्या बातम्या