मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत ड्रग्स पेडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा

मुंबईत ड्रग्स पेडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा

छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता

छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता

छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता

मुंबई, 26 नोव्हेंबर: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) यांना ड्रग प्रकरणात (Drug Case) कोर्टानं जामीन दिला आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( Narcotics Control Bureau) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. NCB नं एका ड्रग्स पेडलरला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा ड्रग्स पेडलर कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा सप्लाय करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा...सत्ताधाऱ्यांना 'हा' डोस घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला

NCBच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अटकेतील ड्रग पेडलरची कसून चौकशी सुरू आहे. छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता आहे. बॉलीवूड कनेक्शनही तपासण्यात येत आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पॅडलरकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

ड्रग पेडलर हा प्रत्येक सप्लिमेंटमधील ड्रग्स सप्लाय करतो. तसेच तो पेटीएम, गूगल पेच्या माध्यमातून पेमेंट घेतो. त्यामुळे त्याचे बँक अकॉउंट ट्रान्झेक्शन देखील तपासण्यात येत आहे.

दुसरीकडे, NCB टीमनं नवाब शेख आणि फारुख चौधरी अशा दोन 2 ड्रग्स पेडलर्ससा अटक केली आहे. दोघांकडून 32.9 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एलएसडीच्या 10 बॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नवाब शेख हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवतो. मुंबई सेंट्रलमधील 'नाथानी हाईट्स' नामक एका आलीशान अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे.

NCB सूत्रांनुसार, कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा नवाब शेख टॅक्सी चालवून हा गोरखधंदा करत होता. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत होता. NCB च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशीरा त्या घरावर छापा टाकला. तर फारुख चौधरी हा एमडी कन्साइनमेंट डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यालाही अटक करण्यात आली. दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.

अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं भारतीनं केलं कबूल...

भारती सिंह आणि तिच्या पती हर्षची चौकशी केल्यानंतर दोघांनाही अंमली विरोधी पथकानं कोर्टात हजर केलं होते. मुंबई मुख्य दंडाधिकाऱ्यांनी दोघांना प्रत्येकी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. त्याचबरोबर चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे.

शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.

हेही वाचा...प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना

भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याशिवाय NCB ने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात देखील छापेमारी केली आहे. भारती सिंहच्या घरावर छापेमारीसाठी एनसीबी संपूर्ण पथकासह पोहचली होती. एनसीबीच्या इतर दोन टीम तिच्या दोन वेगवेगळ्या घरावर पोहचल्या होत्या.

First published:
top videos