10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

  • Share this:

मुंबई, 1 ऑगस्ट- दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी माफ न होणारी प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केली आहे. शासन निर्णय ही जारी झाला आहे. विशेष म्हणजे ही प्रतिपूर्ती RTGSमार्फत थेट विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या फीच्या प्रतीपूर्तीचा प्रश्न आला होता. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेताली असता दुष्काळी भागातील 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीची प्रतिपूर्ती करताना परीक्षा फी माफ केली जाते. मात्र, त्यामध्ये प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्क मात्र आकारले जाते, हे शालेय शिक्षणमंत्र्यांनी निदर्शनास आले. त्याचवेळी त्यांनी हे शुल्क सुद्धा माफ करून संपूर्ण फीची प्रतिपूर्ती करण्यात येईल, असे शासनातर्फे सभागृहात जाहीर केले होते.

दुर्दैवाने दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाचे सर्व आमदारांनी स्वागत केले होते. त्यानुसार तातडीने हा निर्णय घेण्यात आला असून त्याचा शासन निर्णय अत्यंत सुस्पष्टपणे जारी करण्यात आला आहे.

महसूल विभागांना दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फोर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील अशा विद्यार्थ्यांना फोर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी. विद्यार्थ्यांनी फोर्म भरल्यानंतर महसूल विभागातर्फे जी गावे दुष्काळी म्हणून जाहीर होतील, अशा गावातील विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक शासन निर्णयानंतर मंडळाच्या संगणक प्रणालीमधून शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना मंडळामार्फत देण्यात यावी. शिक्षण संचालकांनी विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेली परीक्षा फीच्या रक्कमेची संपूर्ण प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या/पालकांच्या बँक खात्यात RTGS द्वारे जमा करावी याकरिता आवश्यक सर्व व्यवस्था, ऑनलाईन शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 1, 2019, 1:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading