मुंबईकरांचे पाणी महागले

मुंबईकरांचे पाणी महागले

दरवर्षी पावसाळ्या नंतर पाण्यावर दरवाढ केली जाते. मात्र यावर्षी पावसाळ्यापूर्वीच पाण्याचे दर वाढवले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 जून :  महागाईने सर्वसामन्यांचं कंबरडं मोडलेलं असताना आता मुंबईकरांच्या तोंडचं पाणी मुंबई महापालिकेनं पळवलंय. मुंबई पालिकेनं पाण्यावर 3.72 टक्के दरवाढ केलीये. त्यामुळे मुंबईत पाणी महागणार आहे.

मुंबई महापालिकने मुंबईकरांच्या पाण्यावर ३.७२ टक्के दरवाढ केलीय. दरवर्षी पावसाळ्या नंतर पाण्यावर दरवाढ केली जाते. मात्र यावर्षी पावसाळ्यापूर्वीच पाण्याचे दर वाढवले आहेत. ही दरवाढ २०१२ साली सुचवलेल्या सुचनांप्रमाणे केली असून महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात सुचना आज स्थायी समितीमध्ये मांडली. ही पाण्याची दरवाढ दिनांक १६ जून पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती महापौपर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

मुंबईकरांना भातसा, मोडकसागर, तानसा, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिका दर दिवशी ३७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणांतून जलवाहिनीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलेले पाणी शुद्ध करून नंतर मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचवले जाते.

धरणातून मुंबईकरांना घरपोच करण्यात येणाऱ्या पाण्यावरील खर्च वाढला आहे. २०१६-१७ या वर्षांमध्ये जल विभागाच्या आस्थापना खर्चात ५.७४ टक्के, प्रशासकीय खर्चात ३४.५९ टक्के, विद्युतशक्ती खर्चात २.१६ टक्के, सरकारी धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी १२.३७ टक्के, इतर प्रचालन आणि परिरक्षण खर्चात २६.४२ टक्के अशी वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये जलविभागाचा खर्च ७६५.३२ कोटी रुपये होता. तो २०१६-१७ मध्ये ८०६.५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2018 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading