Home /News /mumbai /

...म्हणून त्या दिवशी अश्रू अनावर झाले, डॉ.तृप्ती यांनी सांगितले कारण...

...म्हणून त्या दिवशी अश्रू अनावर झाले, डॉ.तृप्ती यांनी सांगितले कारण...

'खरंतर अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती. एकाच वेळी इतक्या व्यक्तींना हाताळावे लागेल असं वाटलं नव्हतं'

  सुश्मिता बदाणे पाटील, प्रतिनिधी मुंबई, 21 एप्रिल : राज्यावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सर्व रुग्णालय गच्च भरली आहे, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची जाण करून देण्यासाठी एका महिला डॉक्टराला अश्रू अनावर झाले. त्यांनी रडरडच सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केलं. त्यांचं नाव आहे संसर्ग आजार तज्ञ (infectious diseases specialist) डॉ. तृप्ती गिलाडा. डाॅक्टर म्हणून काम करतााना आम्ही हतबल झालोय, असं यापूर्वी कधीच वाटलं नाही परंतु, त्या दिवशी व्हिडीओ बनवताना नेमकी काय परिस्थिती होती हे जाणून घेण्यासाठी डाॅ तृप्ती यांच्याशी आम्ही संवाद साधला. 30 रुपयात स्वादिष्ट जेवण देणारा ‘इंदू का ढाबा’ रातोरात प्रसिद्ध, काय आहे खासियत?
   डाॅ तृप्ती म्हणाल्या की, 'त्यादिवशी वाॅर्ड मधले रूग्ण तपासून झाल्यावर मला फार वाईट वाटलं. माझे काही नातेवाईक रूग्णालयात उपचारासाठी वणवण फिरत होते, त्यांना बेड मिळाला नाही. माझ्या मैत्रीणीचे वडील वारल्याचे समजले. मी डाॅक्टर म्हणून काहीच करू शकले नाही, इतकी गंभीर परिस्थिती आमच्या समोर असताना माझे अश्रू अनावर झाले म्हणून मी नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्यासाठी तो व्हिडीओ बनवला होता.'
  या व्हिडीओमध्ये त्यांनी कोरोनामुळे रुग्णांवर ओढावलेलं संकट, त्यांची बिकट परिस्थिती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीविषयी भाष्य केलं आहे. दिवसेंदिवस सगळ्या राज्य व शहरांमधील स्थिती गंभीर होत चालली आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये जागा नाही. यापूर्वी अशी स्थिती आम्ही कधीच कोणी पाहिली नव्हती. आम्ही हतबल आहोत. जर गेल्या वर्षभरापासून तुम्हाला कोरोनाची लागण झाली नसेल आणि तुम्ही सुपरहिरो आहात किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजामध्ये आहात. आम्ही लोकं 35 वर्षांच्या तरुणांना पाहतोय जे व्हेंटिलेटरवर आहेत आणि मृत्युशी झगडत आहेत, असं तृप्ती यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. मॅच पाहणाऱ्या बाळाचा गोंडस Photo Viral, ओळखलं का ही आईमुलाची जोडी कोण आहे? 'खरंतर अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती. एकाच वेळी इतक्या व्यक्तींना हाताळावे लागेल असं वाटलं नव्हतं. आम्ही लोकांना त्यांच्या घरात राहून ऑक्सिजनची सेवा पुरवण्याचं काम करत आहोत. आताच्या परिस्थितीमध्ये आमच्या डॉक्टरांचादेखील भावनिक बांध फुटू लागला आहे. त्यामुळे या काळात कृपया स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कोरोना तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघतांना मास्क वापरा. ताप आला तर घाबरुन जाऊ नका लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा' असं आवाहनही तृप्ती यांनी केलं.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या