News18 Lokmat

सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीत - डॉ. प्रकाश आमटे

अनेक डॉक्टर दुर्गम भागात विनामुल्य सेवा करायचे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2018 08:39 AM IST

सरकारच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचतच नाहीत - डॉ. प्रकाश आमटे

मुंबई, १ ऑक्टोबर २०१८- देश आज मंगळावर जाण्याचा पराक्रम गाजवतोय, मात्र आजही केंद्र शासनाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत हे देशाचं दुर्भाग्य असल्याची खंत ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं  कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कल्याणमध्ये दिव्यांग बांधवाचा महामेळावा

कल्याण येथील तिसाई देवी मंदिर मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खर तर दिव्यांग  शब्द काढून टाकला पाहिजे .कारण हे सर्व बांधव  इतरांप्रमाणे काम करण्यास सक्षम आहे असे मत डॉ. आमटे यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, पूर्वी लोक डॉक्टरांना देवाच्या जागी मानत होते. अनेक डॉक्टर दुर्गम भागात विनामुल्य सेवा करायचे. आजही काही डॉक्टर समाजसेवेसाठी पुढाकार घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे.

गरजूंना विनामुल्य सेवा देणारे असे डॉक्टर इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून आज लोकांच्या मनात असलेली डॉक्टरांची प्रतिमा बदलत असल्याचे ते म्हणाले. आज  दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना आहेत. मात्र त्याच्या लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. एकीकडे देश मंगळ ग्रहावर जाऊन नवा पराक्रम करत आहे मात्र दुसरीकडे गरजू केंद्र शासनाच्या अनेक योजना या बांधवांपर्यंत पोहचत नाही हे देशाचे दुर्भाग्य आहे अशी खंतही आमटे यांनी व्यक्त केली.

या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचून त्यांना मदतीचा हात देणारे डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील पहिले खासदार असल्याने इतर खासदारांनीही त्याचे अनुकरण करावे असा सल्लाही आमटे यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमाच्या वेळी साडेआठशेहुन अधिक दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, स्मार्ट फोन, ब्रेल किट आदी विविध मदत साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. नवीन दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळावा यासाठी पुन्हा नोंदणीही करण्यात आली.

Loading...

VIDEO : मुंबईतल्या 'बीकेसी'त निघाला अकारा फुटाचा अजगर; नागरिकांमध्ये दहशत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...