कुख्यात दहशतवादी डॉक्टर बॉम्ब मुंबईतून 'गायब', पोलिसांचा तपास सुरू

कुख्यात दहशतवादी डॉक्टर बॉम्ब मुंबईतून 'गायब', पोलिसांचा तपास सुरू

50हून अधिक बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये जलीसचा हात तर 1992 पासून 6 स्फोटांचे आरोप.

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी: कुख्यात दहशतवादी गुंड डॉ. जलीस अन्सारी फरार झाला आहे. मुंबईतून पॅरोलवर सुटून अन्सारी याआधी फरार झाला होता. अजमेर जेलमधून पॅरोलवर बाहेर आला असताना फरार झाला आहे. 90 च्या दशकापासून 50हून अधिक बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये हात असल्याचं समोर आलं आहे. तर 1992 पासून त्याच्यावर 6 बॉम्बस्फोटाचे आरोप आहेत. अजमेर इथे पॅरोल मिळाल्यानंतर अन्सारी काही दिवसांसाठी मुंबईत आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता. मात्र त्यानंतर शुक्रवारी सकाळी तो फरार झाल्याची माहिती मिळत आहे.

आग्रीपाडा पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एटीएस आणि क्राइंम ब्रांचला याची माहिती दिली. एटीएस आणि क्राइंम ब्रांचकडून जलीस अन्सारीचा शोध सुरू आहे.

देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देणारा दहशतवादी जलीस अन्सारी 50 हून अधिक स्फोटात त्याचा हात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी त्याचा पॅरोल संपणार होता. त्यानंतर त्याला अजमेर जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गुरुवारी सकाळी 5 च्या सुमारास तो बेपत्ता झाला. जलीस फरार झाल्यानं अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जलीस अन्सारीचे इंडियन मुजाहिद्दीन, सिमी यांच्यासह इतर दहशतवादी संघटनांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. तो अनेक दहशतवादी संघटनांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग द्यायचा. त्याला डॉ. बॉम्ब नावाने ओळखलं जातं. मालेगाव स्फोटातील तो प्रमुख आरोपी होता. देशभरातील जवळपास 50 बॉम्ब स्फोटात त्याचा हात असल्याचं सांगितलं जातं.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीतील आरोपी आणि दहशतवादी अन्सारी अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First published: January 17, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या