मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून विशेष गाड्याची सोय, असं असेल वेळापत्रक

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेकडून विशेष गाड्याची सोय, असं असेल वेळापत्रक

उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर   (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din)  रेल्वे प्रशासनानं लोकल रेल्वेची विशेष सोय केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 05 डिसेंबर: उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) रेल्वे प्रशासनानं लोकल रेल्वेची विशेष सोय केली आहे. उद्या रेल्वेकडून 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. 6 डिसेंबरला दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधांचे नियोजन करण्यात आलं आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरिता 8 उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. असं असेल विशेष लोकलचं वेळापत्रक कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल. कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल. हेही वाचा- रोहित शर्माला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याची तयारी! वाचा BCCI चा खास प्लॅन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल. हार्बर मार्गावरील विशेष सोय पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल. हेही वाचा- ओमायक्रॉनची भीती! राज्यातल्या या जिल्ह्यात पहिली जमावबंदी लागू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.
First published:

Tags: Mumbai local

पुढील बातम्या