हुंड्यासाठी सासू-सासऱ्यांनी दोन्ही सुनांना विकल्याचा प्रकार उघड !

हुंड्यासाठी सासू-सासऱ्यांनी दोन्ही सुनांना विकल्याचा प्रकार उघड !

दोन्ही सुनांच्या माहेरवरून जवळपास चौदा ते पंधरा लाख रूपये उकळल्यावर सुद्धा घरातल्यांचे समाधान न झाल्याने अजून चार लाख रूपयांची मागणी केली होती

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

विरार,21 आॅक्टोबर : विरार इथं एकाच घरातील दोन सुनांचा हुंड्यासाठी अतोनात छळ करून शेवटी सासू सासऱ्यानेच दोन्ही सुनांना विकुन टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विरार पश्चिमेच्या एम बी इस्टेटच्या सुमन कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या दोन रावल कुटुंब आहे. रावळ कुटुंबीयांनी या सख्या दोन बहिणींना हुंड्या करिता आतोनात हाल करण्यात आले. रावळ कुटुंबाने आपल्या आपल्या दोन मुलानं सोबत या बहिणींचं लग्न लावून दिलं होतं. लग्न झाल्यानंतर ६ महिने सगळं काही सुरळीत चालल होतं मात्र, त्यानंतर रावल कुटुंबाचा रावणपणा जागा झाला आणि या सख्या बहिणींवर हुंड्यासाठी अडीच वर्षे छळ सुरू होता.

दोन्ही सुनांच्या माहेरवरून जवळपास चौदा ते पंधरा लाख रूपये उकळल्यावर सुद्धा घरातल्यांचे समाधान न झाल्याने अजून चार लाख रूपयांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यात मुलींचे आई वडील असमर्थ ठरल्याने त्यांचा विरार येथे अतोनात छळ करण्यात आला.

मात्र नंतर त्यांना राजस्थान इथं विरवाडा या गावाला नेऊन मुलाकडच्या नातेवाईकांनी जाळून मारण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. इतकंच नाही तर या सुनांना एका अनोळखी व्यक्ती बरोबर मुंबईला पाठवण्यात आले होते तर त्या व्यक्ती सोबत नुसताच पाठवण्यात आलं नव्हतं तर या दोन सख्या बहिणींना दीड लाखात विकल्याचे त्या इसमाने त्या मुलींना सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला या बाबत जेव्हा या बहिणीनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या रावळ समाजाच्या जातपंचायत अध्यक्षांनी त्यांना धमकी दिली की जर का तुम्ही तक्रार करून समाजाचा नाव खराब करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या माहेरच्या कुटुंबाला वाळीत टाकू आणि तुमच्या भावंडांची लग्न सुद्धा आम्ही होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली होती.

इतक्यावरच थांबले नसून त्यांचा प्लॅन फेल गेल्याचे समजताच सासरच्यानी राजस्थानमध्ये घरी चोरी केल्याची खोटी तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं दोन्ही बहिणींनी सांगितलं असून त्यांच्या जीवितास धोका असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं.

सदर प्रकरण पालघर जिल्हा महिला आणि बालकल्याण विकास विभागाकडे गेल्यावर श्री यादव  ह्यांनी ह्या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून दोन्ही मुलींचे जाब जबाब नोंद केले. त्यानंतर पालघर जिल्हा पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांच्या निर्देशानुसार विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  सदर या बहिणीनं सोबत घडलेल्या प्रकाराला सोसायटीमधील महिला रहिवाश्यानी निषेध व्यक्त केला आहे. पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत.

==============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 11:01 AM IST

ताज्या बातम्या