चारित्र्यावर संशय; पतीचा पत्नी आणि सासूवर चाकू हल्ला, स्वत: केला आत्महत्येचा प्रयत्न

चारित्र्यावर संशय; पतीचा पत्नी आणि सासूवर चाकू हल्ला, स्वत: केला आत्महत्येचा प्रयत्न

पती आपल्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, त्यावरून नेहमी भांडणे होत असल्याचं मंजुने सांगितलंय.

  • Share this:

विजय देसाई, विरार 29 ऑगस्ट : विरारमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी  आणि सासूवर चाकूने हल्ला केला. आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात त्याची पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाल्या असून पतीने इमारतीवरून उडी मारल्याने तोही गंभीर जखमी आहे. या घटनेने विरारमध्ये खळबळ उडाली आहे.

विरार पूर्वेकडील साईबाबा मंदिर जवळ करसन वासरा आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांच्या पत्नी मंजू यांचं हे दुसरं लग्न होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांचं हे लग्न झालं होतं. मंजू यांना आधीच्या पतीपासून एक 11 वर्षांची मुलगीही आहे. मात्र सुरवातीचा काही काळ सोडला तर मंजू आणि कारसन यांचं नेहमी भांडण होत असे. तो कायम मंजूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. करसन याने आज सकाळीही  मंजूला बेदम मारहाण करून चाकूने तिचे हात कापण्याचा प्रयत्न केला.

शाळेत बागडणाऱ्या किड्यांचा मुलांना चावा, 75 मुलं हॉस्पिटलमध्ये

मंजूची आई लक्ष्मी कटारिया याही घरी त्यावेळी घरी होत्या. त्या मंजूला वाचवण्यासाठी पुढं आल्या तेव्हा करसनने त्यांच्यावरही हल्ला करत त्यांना जखमी केलं. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघींनाही रुगणालयात दाखल केलं. करसनने हातावर इजा करून इमारतीच्या गच्चीवरून खाली उडी टाकली. यात तोही गंभीर जखमी झालाय.

पुन्हा होणार राजकीय 'भूकंप', हे 5 दिग्गज नेते करणार भाजपमध्ये प्रवेश

या सगळ्यांना विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. करसनची प्रकृी गंभीर असल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आलं आहे. पती आपल्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. घराच्या बाहेर जाऊ देत नव्हता, त्यावरून नेहमी भांडणे होत असल्याचं मंजुने सांगितलंय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 29, 2019, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading