भ्रष्टाचारी सेनेसोबत राहायचं नाही, KDMC मध्ये भाजपच्या उपमहापौरांनी दिला राजीनामा

भ्रष्टाचारी सेनेसोबत राहायचं नाही, KDMC मध्ये भाजपच्या उपमहापौरांनी दिला राजीनामा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

कल्याण, 20 जानेवारी : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर स्थानिक पातळीवरही शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरूच आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपच्या उपमहापौरांनी भ्रष्टचारी सेनेसोबत काम करायचं नाही सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत उपेक्षा भोईर यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहे.  केडीएमसीमध्ये विकास कामे होत नाही, अनधिकृत बांधकामांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, असा आरोप त्यांनी केला.

आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत भाजप उपमहापौर यांची अनधिकृत बांधकामाविषयी प्रस्ताव मांडला होता. पण शिवसेनेने नाटक करून विषय मांडू दिला नसल्याचा आरोप उपमहापौरांनी केला. त्यामुळे

भ्रष्टाचारी शिवसेनेसोबत भाजप राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. परंतु, महापौर नसल्याने राजीनाम्याचे पत्र अद्याप दिलेले नाही.

दरम्यान, शिवसेनेने उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BJP
First Published: Jan 20, 2020 08:16 PM IST

ताज्या बातम्या