मुंबई, 01 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्यामुळे राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या पाठोपाठ अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी सुद्धा 'मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये' असा सल्ला दिला आहे.
ममता बॅनर्जी भाजपविरोधात लढण्यासाठी नवीन पर्याय दिला पाहिजे, असं विधान करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे' असं म्हणत अशोक चव्हाण यांनी ममतादीदींना आठवण करून दिली.
IPL 2022 : 24 तासांमध्ये पंजाबला दुसरा धक्का, राहुलनंतर आणखी एकाने सोडली साथ
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही' असा सल्लावजा टोला चव्हाणांनी लगावला.
तर दुसरीकडे, 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे' असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ममतादीदींना लगावला आहे.
कुछ भी! म्हणे मेलेल्या बॉयफ्रेंडनं केलं प्रपोज, लवकरच आत्म्याशी होणार शुभमंगल
ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपविरोधात लढण्यासाठी ममतादीदींनी नवीन पर्याय दिला पाहिजे, असं विधान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.
तसंच, 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे' असा टोलाही पटोले यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.