मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले, म्हणाले...

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले, म्हणाले...

'आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत आणि कायम राहू, तुमच्या प्रमाणपत्राताची गरज नाही'

'आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत आणि कायम राहू, तुमच्या प्रमाणपत्राताची गरज नाही'

'आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत आणि कायम राहू, तुमच्या प्रमाणपत्राताची गरज नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 17 नोव्हेंबर : 'आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आजही आहे आणि कायम राहणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही' असं म्हणत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने (Balasaheb Thackeray Memorial Day) छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे कुटुंबीय आणि सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना भाजपला चांगलेच फटकारून काढले.

'आमचं हिंदुत्व हे प्रमाणित करण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आजही आहे आणि कायम राहणार आहे. त्यामुळे तुमच्याकडून कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही. देशाला जिथे कुठे शिवसेनेची गरज पडेल तिथे शिवसेना हिदुत्वाची तलवार घेऊन हजर राहिल' असंही राऊत म्हणाले.

'बाळासाहेब ठाकरे हे आमच्यात नाही ही वेदना कायम आहे. बाळासाहेब सतत विचारांने आमच्यासोबत कायम आहे. आम्ही फक्त त्यांना देहाने निरोप दिला. पण, त्यांचे विचार, हिदुत्व, मराठी बाणा हे सर्व कायम स्वरुपी आमच्यासोबत आहे. हाच वारसा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत' असंही राऊत म्हणाले.

तसंच, आजही बाळासाहेबांनी जो बेरोजगारी, भूमीपुत्रांचा मुद्दा मांडला होता, त्यावरच केंद्राचे राजकारण सुरू आहे. बिहार निवडणुकीत पाहिलं असेल तर या दोन्ही मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली. प्रत्येक राज्यात भूमीपूत्रांचा विषय राजकारणातला महत्त्वाचा आहे, असं मतही राऊत यांनी मांडले.

देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

दरम्यान, भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 'विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम! : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असं म्हणत एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही वाक्य आहे.

'बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांसाठी प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्त्रोत होते. बाळासाहेबांचं भाषण हे नेहमी सल्ला होते.  आपल्याला जे बोलायचे ते खणखणीत मांडायचं, लोकांना पटेल असं बोलायचं. त्यांच्या मनात असेल ते बाळासाहेब बोलायचे. त्यांना कोणी बोलावू शकत नव्हतं' असं फडणवीस यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं.

'दुसऱ्यांच्या विचाराने स्वत: चे विचार बिघडवू नका, प्रामाणिक राहा, फसवेगिरी आली की संपलं. प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात असला पाहिजे. त्याच बरोबर हिंदुत्व विसरू नका, भारताला वाचवण्यासाठी तुम्हीच पुढे आले  पाहिजे' असं बाळासाहेबांचं विधान सांगत फडणवीसांनी सेनेला टोला लगावला आहे.

तसंच अमित शाह आणि पक्षाचे इतर नेते यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कसा आदर होता हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे विचारांवर आणि विधानांवर ठाम होते, असं म्हणत शिवसेनेला त्यांच्या बदललेल्या भूमिकेची आठवण करुन देण्यात आली आहे.

First published:

Tags: Uddhav Thackery, भाजप