मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /भाजप चढणार 'मातोश्री'ची पायरी? बावनकुळेंनी सांगितलं खरं कारण...

भाजप चढणार 'मातोश्री'ची पायरी? बावनकुळेंनी सांगितलं खरं कारण...


'कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत.

'कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत.

'कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 05 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडीने लढवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपकडून महाविकास आघाडीला विनंती केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पण विरोधकांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक अटळ मानली जात आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी मविआला विनंती केली आहे.

(एकनाथ शिंदेंचा मातोश्रीवर फोन आला का? संजय राऊत मिश्किल हसले आणि म्हणाले...)

'कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी फोन केले आहे आणि पत्रही पाठविणार आहोत. याआधी आपण असे अनेक उदाहरणं बघितले की, ज्यांच्या घरचा व्यक्तीचे निधन झाले आहे, त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना विनंती करणार की सात आठ महिन्यासाठी ही निवडणूक लढू नये, अशी विनंती बावनकुळे यांनी केली.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेशी बोलले की नाही, हे मला माहित नाही. ही भाजपची जागा आहे. त्यामुळे ती आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे यासंदर्भात देवेंद्र फडणवीस हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बोलतील, असं बावनकुळे म्हणाले.

'पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे अपक्ष होते म्हणून आम्ही त्यांना मदत केली. भाजपच्या टीमने समर्थन दिला आहे. ते महाविकास आघाडीत असते तर आम्ही त्यांना मदत केली नसती पण ते महाविकास आघाडीविरोधात लढले त्यामुळे आम्ही त्यांना समर्थन दिलं स्थानिक पातळीवर समर्थन दिलं आहे, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

(नजीब मुल्लांसह नगरसेवक पुन्हा शिंदेंच्या भेटीला; आव्हाडांचं टेन्शन वाढलं!)

'लिंगाडे हे नशिबाचे धनी आहे. त्यांच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाहीये आम्ही त्यांचा अभिनंदन करतो आहे. खरं तर ही निवडणूक आम्ही हरायला नको होतो मात्र का हरलो याचा अभ्यास आम्ही करतो आहे. आम्ही हार मान्य केली आहे काय आमचं चुकलं याचा आत्मचिंतन आम्ही करणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्राची आमची वार रूम तयार आहे आताही विदर्भ विभागाची वॉर रूम तयार करण्यात आली. या माध्यमातून दहा लोकसभा आणि संपूर्ण विधानसभा वॉर रूम मधनं काम करणार आहे. सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांचा कमुनिकेशन या माध्यमातून होणार आहे. बूथपर्यंत आम्ही डेटा मॅनेजमेंट करतो आहे. 20 घरांना एक कार्यकर्ता आम्ही जोडणार आहोत त्याचं पूर्ण मॅनेजमेंट या माध्यमातून होणार आहे. डेटा मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हे सगळे मॅनेजमेंट इथून होणार आहे. प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला वॉर रूम नोंदवून घेणार आहे, आणि हे वार रूम केंद्राच्या सरल अपला जोडणार आहे. तीन कोटीचा डेटा मॅनेजमेंट आम्ही करतो आहे. आमचा धन्यवाद मोदीजी अभियान सुरू आहे ते सगळं आम्ही या माध्यमातून करणार आहोत. 18 ते 25 वयोगटातील युवा वॉरिअरच्या माध्यमातून जोडले जात आहे, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

First published:

Tags: उद्धव ठाकरे