Elec-widget

म्हाडाचं घरं देतो असं म्हणणाऱ्या 'या' एजंटवर विश्वास ठेऊ नका

म्हाडाचं घरं देतो असं म्हणणाऱ्या 'या' एजंटवर विश्वास ठेऊ नका

  • Share this:

प्राजक्ता पोळ, प्रतिनिधी

मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबईकरांनो तुम्ही १३८४ घरांसाठी जे अर्ज भरत आहात त्यांना जर कोणी म्हाडा लॉटरीमधलं घरं मिळवून देतो असं सांगणारे एजंट भेटले तर त्याच्या फसवणूकीला बळी पडू नये. अशी सुचना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली आहे.

म्हाडाने असे कोणतेही एजंट नेमलेले नाहीत. आणि जर असं कोणी फसवत असेल तर या  ०२२६६४०५४४५ या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी केल्यानंतर २० दिवसांत ७९३०० लोकांनी अर्ज भरले आहेत. त्यासाठी अजून २० दिवस बाकी आहेत.

मागच्या लॉटरीमध्ये ६५ हजारांच्या आसपास अर्ज आले होते. त्यामुळे किंमती कमी केल्यानंतर लोकांचा खूप मोठा प्रतिसाद या लॉटरीला मिळतोय. ५ कोटींच्या वरची जी घरं आहेत या तीनही ठीकाणच्या घरांना सर्व मिळून जवळपास १०० अर्ज दाखल झालेले आहेत.

Loading...

कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये पलावा सीटीमध्ये ओसी मिळूनही जीएसटी लावण्याच्या तक्रारी आल्या होत्या. पण लोकांनी तो जीएसटी भरू नये हे म्हाडाकडून जाहीर करण्यात येत असल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे मधु चव्हाण यांनी पत्र लिहून अत्यल्प आणि अल्प घरांच्या किंमती अजून कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे म्हाडाच्या पुढच्या लॉटरीमध्ये आम्ही घरांच्या किंमती अजून कमी करण्याचा विचार करू असं उदय सामंत म्हणाले आहे.

दरम्यान, गिरणी कामगारांच्या घरांबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊ असंही सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. जर कोणी तुम्हाला घरांची अशी ऑफर दिली तर त्यावर विचार करण्याआधी गोष्टींची पडताळणी नक्की करा.


VIDEO भयानक : मुक्या जनावरावर केले त्यानं चाकूने सपासप वार


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...