मुंबई, 17 जुलै: मुंबईतील डोंगरी परिसरात काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवरील सर्व उपचार राज्य सरकारकडून केला जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतर अजूनही ढिगारा काढण्याचे काम सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बुधवारी सकाळीही मदत आणि बचाव काम सुरु आहे. आतापर्यंत 23 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी एका लहान मुलासह 9 जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींवर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डोंगरी इमारत दुर्घटना: मृतांची संख्या 14वर पोहोचली; ढिगारा उपसण्याचे काम सुरूच!
Dongri building collapse incident: Maharashtra CM Devendra Fadnavis announces compensation of Rs 5 Lakh for the next of kin of the deceased and Rs 50,000 for the injured, and all medical expenses of the injured to be borne by the state government. (File pic) pic.twitter.com/uSaAob0OEk
— ANI (@ANI) July 17, 2019
मुंबईतील डोंगरी भागात मंगळवारी सकाळी 11.40च्या सुमारास केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली होती. जवळ जवळ 80-100 वर्ष जुनी असेलल्या या इमारतीत 15 कुटुंब राहत होती. या कुटुंबातील 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते.NDRFने दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या 14वर पोहोचली आहे.
कोसळधारमुळे काझीरंगा अभयारण्य पाण्याखाली, जीव वाचवण्यासाठी प्राण्यांची धडपड