आ...रा...रा खतरनाक! 72 वर्षीय वडील आणि 45 वर्षाच्या मुलाने गाजवली क्रिकेट स्पर्धा

आ...रा...रा खतरनाक! 72 वर्षीय वडील आणि 45 वर्षाच्या मुलाने गाजवली क्रिकेट स्पर्धा

जेष्ठ नागरिकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले असून 'नगरसेवक चषक' असे या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले आहे.

  • Share this:

डोंबिवली, 17 फेब्रुवारी : पिसवली गावात मागील दोन दिवसांपासून अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वयाच्या चाळीशी पुढील नागरिकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात काही जेष्ठ नागरिकांनी सुद्धा भाग घेतला. या स्पर्धेत निळजे संघातील 72 वर्षाचे श्रीपत म्हात्रे आणि त्यांचा मुलगा महेंद्र म्हात्रे(वय 45) यांनी खेळलेली खेळी हे सर्व प्रेक्षकांचे आकर्षण ठरले आहे.

क्रिकेट म्हणजे तरुणांचे जीव की प्राण आणि त्याची धूम सध्या डोंबिवली आणि ग्रामीण भागात सर्वाधिक आहे. मात्र भाजपचे माजी उपमहापौर आणि नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि उद्योजक श्रीपत भोईर यांनी जेष्ठ नागरिकांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले असून 'नगरसेवक चषक' असे या स्पर्धेचे नाव ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेत जेष्ठ नागरिकांनी सुद्धा भाग घेतला. एकूण 16 संघ आपला उत्तम खेळ दाखवत आहेत. त्यामुळे तरुणांसोबत जेष्ठ नागरिकदेखील क्रिकेट खेळाचा आनंद घेताना दिसून आले आहेत. या स्पर्धेत निळजे आणि नवा पाडा या दोन संघांमध्ये अंतिम लढत झाली आणि नवा पाडा गावातील संघाने विजय मिळवला.

आयोजक भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर आणि उद्योजक श्रीपत भोईर यांनी विजेत्यांना 50 हजार रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानीत केले. या स्पर्धेला आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार , भाजप नगरसेवक रमाकांत पाटील आणि इतर मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती लावली.

डोंबिवली आणि ग्रामीण भागातील तरुणांच्या क्रिकेट स्पर्धेप्रमाणे या 40 नागरिकांची क्रिकेट स्पर्धा देखील सर्व क्रिकेट प्रेमींची आकर्षणाची ठरली. त्यामुळे तरुणांसोबत जेष्ठ नागरिकांना दिलेल्या या प्रोत्साहनाने जेष्ठ नागरिकांनी देखील आयोजकांचे आभार मानले आहे.

First published: February 17, 2020, 9:46 PM IST
Tags: dombiwali

ताज्या बातम्या