डोंबिवलीत रस्त्यावर दहीहंडी लावणाऱ्या सेना-मनसे आयोजकांवर गुन्हे दाखल

डोंबिवलीत रस्त्यावर दहीहंडी लावणाऱ्या सेना-मनसे आयोजकांवर गुन्हे दाखल

डोंबिवली रामनगर पोलिसांनी शिवसेना,मनसे यांच्या विरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून त्याची नोंद "जिल्हा गुन्हे अहवालात"करण्यात आली.

  • Share this:

16 आॅगस्ट : डोंबिवली आणि परिसरात दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना डोंबिवली रामनगर पोलिसांनी शिवसेना,मनसे यांच्या विरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून त्याची नोंद "जिल्हा गुन्हे अहवालात"करण्यात आली. मात्र बाजी प्रभू चौकात भाजपने संपूर्ण चौकच ताब्यात घेऊन वाहतुकीचा बोजवारा उडवला असताना  "जिल्हा गुन्हे अहवालात'' भाजपच नाव नसल्याने राजकीय गोटात चांगलीच चर्चा रंगली.

मनसेच्या शहर शाखेतर्फे चार रस्त्यावर, तर शिवसेनेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी शिवमंदीर रोडला असलेल्या चौक येथे दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. दहीहंडी उत्सवादरम्यान न्यायालयने दिलेले निर्देश आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शासनाच्या नियमांच्या अटी आणि शर्तींचे भंग, तसंच पोलिसांच्या नोटीसचा भंग करून उत्सव साजरा केला. त्यासाठी देण्यात आलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजमुळे वाहतुकीस अडथळा झाल्याचा ठपका ठेवत मनसेच्या शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह शिवसेना सभागृह नेते राजेश मोरे यांच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या संदर्भात राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, आपण सर्वांची रितसर परवानगी घेऊन स्टेज उभारल्याचे सांगून गुन्हा दाखल केल्याबद्दल नाराजी दर्शवली. असाच गुन्हा मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तथापी भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मार्केटमध्ये असलेल्या बाजी प्रभू चौकात दोन स्टेज उभारून संपूर्ण रस्ता बंद केला. परिणामी परिवहन सेवा, रिक्षा वाहतूक ठप्प झाली. जिल्हा गुन्हे नोंद अहवालात भाजपच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची नोंद नाही.

या अहवालात भाजपाचे नाव वगळल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या संदर्भात डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांना विचारले असता त्यांनी भाजपवर गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. पोलीस ठाण्यात विचारले असता भाजपाचे पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिरवाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. तर जिल्हा गुन्हे अहवालात नोंद का नाही, याचा खुलासा पोलिसांना करता आला नाही.

या संदर्भात मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांना विचारले असता ते म्हणाले, मनसेतर्फे दरवर्षी त्याच ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. पालिका, अग्निशमन दल, पोलीस खात्याकडून रितसर परवानग्या घेतल्या जातात. यंदा देखिल रितसर परवानग्या घेतल्या आहेत. मात्र जे पोलिस परवानगी देतात तेच पोलिस आमच्यावर गुन्हे कसे दाखल करतात, या बद्दल शहराध्यक्ष घरत यांनी आश्चर्य व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...