डोंबिवली-पुणे एसटी बस सेवेला सुरुवात

डोंबिवली-पुणे एसटी बस सेवेला सुरुवात

शिवनेरीच्या मागणीला जोर धरत असताना एसटी महामंडळाने आज डोंबिवली पुणे एसटी सेवा सकाळपासून चालू केली.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

15 मे : डोंबिवली ते पुणे एसटी बसेसला अखेर सुरुवात झाल्यामुळे डोंबिवलीकरांच्या मागणीला अखेर यश आलंय.

डोंबिवलीमधून राज्यभरात एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोजची 500 ते 600 च्या घरात आहे. डोंबिवलीत अनेक पुणेकर स्थायिक झाले असून पुण्याला जायचं झाल्यास ठाणे किंवा कल्याणहून रेल्वेनं, किंवा कल्याण अथवा विठ्ठलवाडी आगारातून बसने या प्रवाशांना जावं लागत होतं. इतक्या वर्षांत थेट पुण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यानं डोंबिवलीकरांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यामुळे प्रवाश्यांकडून शिवनेरी बस सेवा चालू करा अशी मागणी होत आहे.

शिवनेरी बस सेवेसाठी डोंबिवलीकरांना ठाणे जावे लागते. ती जर सेवा डोंबिवलीमधून दिली तर याचा फायदा डोंबिवलीसोबत, ठाकुर्ली, दिवा आणि नवीन विकसित होणार ग्रामीण पट्यातील लोकांना होऊ शकतो.

शिवनेरीच्या मागणीला जोर धरत असताना एसटी महामंडळाने आज डोंबिवली पुणे एसटी सेवा  सकाळपासून चालू केली. मागणी शिवनेरी एसी बस सेवेची असताना मात्र दिली एसटी असे असताना डोंबिवलीकर एसटीने प्रवास करतील का हे पाहावे लागेल त्याच प्रमाणे एसटी डेपोची झालेली दुरावस्था याकडे राज्यशासन लक्ष घालेल का हे सुद्धा पाहावे लागेल.

First published: May 16, 2017, 12:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading