Home /News /mumbai /

हिरव्या आणि तेलाच्या पावसानंतर डोंबिवलीत आता चक्क गुलाबी रस्ता

हिरव्या आणि तेलाच्या पावसानंतर डोंबिवलीत आता चक्क गुलाबी रस्ता

कधी कारखाण्यात स्फोट होणं, कामगारांचा वायु गळतीने मृत्यू होणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये कारखाण्यात एवढे प्रचंड स्फोट झाले की त्यामुळे सगळा परिसर हादरुन गेला होता.

डोंबिवली 04 फेब्रुवारी : रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत आज चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली MIDCमध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. तर केमिकल मुळे एमआयडीसीतला रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. त्यामुळे यावरून चर्चा सुरु झाली असून प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हा गुलाबी रंग अजून काही रस्त्यांवर दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचंही पुढे आलंय. या केमिकल मुळे मोठ्या प्रमाणात उग्र दर्प सुटला असून डोळे चुरचुरणे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. डोंबिवलीतल्या या प्रदुषणामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावं लागतंय. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर रसायनांचे कारखाने आहे. हे सर्व कारखाने सुरक्षा आणि पर्यावरणांच्या निकषांचं पालन करत नाहीत. त्यामुळे अनेक अपघात या आधी झालेले आहे. नवनीत राणाची सनी देओल स्टाइल, महिलांच्या प्रश्नावर लोकसभेत आक्रमक कधी कारखाण्यात स्फोट होणं, कामगारांचा वायु गळतीने मृत्यू होणं अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये कारखाण्यात एवढे प्रचंड स्फोट झाले की त्यामुळे सगळा परिसर हादरुन गेलाय.  या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरीक करत असतात मात्र तात्पुरत्या मलमपट्टीपलिकडे फारचं काहीच झालं नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

हिंगणघाट जळीत प्रकरण : जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितला हा उपाय

नव्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी असून ते आता या प्रकरणात लक्ष घालतील अशी आशा इथल्या नागरीकांनी व्यक्त केलीय.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या