डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

या भागात तीन कुटुंबे वास्तव्यास होती, मात्र दुर्घटना घडली त्यावेळी त्यापैकी कुणीही घरात नव्हतं.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

04 जुलै : डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. मात्र सुदैवानं यात कुणालाही कोणतीही इजा झालेली नाही.

डोंबिवलीच्या पूर्व भागातील आयरे रोड परिसरात गंगाराम सदन नामक इमारत असून ती ३५ वर्ष जुनी आहे. मागील काही वर्षांपासून ती धोकादायक बनली होती, मात्र तरीही रहिवासी त्यात वास्तव्यास होते. आज दुपारी दीडच्या सुमारास या इमारतीचा एक भाग अचानक कोसळला.

या भागात तीन कुटुंबे वास्तव्यास होती, मात्र दुर्घटना घडली त्यावेळी त्यापैकी कुणीही घरात नव्हतं. त्यामुळं यात कुणीही जखमी झालं नाही. या घटनेनंतर अग्निशमन दल, तसंच केडीएमसी प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू केलं. या इमारतीत राहणारे सर्व रहिवासी पागडी पद्धतीनं राहत असून इमारत धोकादायक झाल्यानं त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

विशेष म्हणजे, पावसाळ्याला सुरुवात झाली असून केडीएमसीनं यंदा 531  इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 06:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading