S M L

सांस्कृतिक नगरीला वाढत्या गुन्हेगारीचं गालबोट, डोंबिवली झाली 'क्राइम सिटी' !

धक्कादायक बाब म्हणजे मागील 1 महिन्यांत डोंबिवलीत ३ खून झाले असून या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसतायत.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 09:39 PM IST

सांस्कृतिक नगरीला वाढत्या गुन्हेगारीचं गालबोट, डोंबिवली झाली 'क्राइम सिटी' !

 प्रदिप भणगे, डोंबिवली

31 मे : सांस्कृतिक नागरी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरात मागील वर्षभरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झालीये. धक्कादायक बाब म्हणजे मागील 1 महिन्यांत डोंबिवलीत ३ खून झाले असून या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरताना दिसतायत. महिन्याभरात डोंबिवलीत ३ खून झाले हे सर्व खून परवानाधारी बंदुकीतून झाल्याचे उघड झाले. डोंबिवलीमध्ये एकूण 4 पोलीस स्थानक येतात. या मध्ये तब्बल 668 शस्त्र परवान्यांची खैरात केली आहे.

लायसनधारी शस्त्राची माहिती ( पोलीस दप्तरी माहिती)मानपाडा पोलीस स्थानक

एकूण - 169

पिस्तुल -21

Loading...

रिव्हॉव्हर-72

बंदूक ( रायफल धरून)  -76

रामनगर पोलीस स्थानक

एकूण - 188

पिस्तुल - 86

रिव्हॉव्हर-72

बंदूक ( रायफल धरून) -30

विष्णुनगर पोलीस स्थानक

एकूण - 241

पिस्तुल - 42

रिव्हॉव्हर-102

बंदूक ( रायफल धरून) -97

टिळकनगर पोलीस स्थानक

एकूण - 70

पिस्तुल - 12

रिव्हॉव्हर-35

बंदूक( रायफल धरून) -23

४ एप्रिल २०१७ रोजी सुरेश मंचेकर टोळीचा गुंड विठ्ठल नवघरे याची चाकूने भोसकून हत्या झाली. ९ मे २०१७ रोजी ठाकुर्लीत घराच्या दुरुस्तीचं काम घेण्याच्या वादातून किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची हत्या झाली.१३ मे २०१७ रोजी झाडावरील कै-या तोडण्याच्या वादातून पुतण्या जयेश म्हात्रे याने सख्खा काका गणपत म्हात्रे यांच्यावर केला. २६ मे २०१७ रोजी  दत्तनगर भागात डॉ. शिरीष जोशी यांच्यावर दोन तरुणांनी वार करून बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि ३० मे रोजी आयरे गावात जागेच्या वादातून विक्रांत उर्फ बाळू केणे या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली.

मागील दोन महिन्यांत घडलेल्या या घटना पाहिल्या, तर डोंबिवलीची सांस्कृतिक नगरी म्हणून असलेली ओळख किती झपाट्यानं लोप पावत चाललीये, याचा सहज प्रत्यय येतो. यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवली नगरीतच पार पडलं होतं. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात ज्या वेगाने डोंबिवलीत गुन्हेगारी घटना घडल्या, त्या रोखण्यात पोलीसही सपशेल अपयशी ठरले आहेत. डोंबिवलीत ९० च्या दशकात गाजलेल्या केएमसी टोळी आणि नवनाथ टोळीच्या युद्धाच्या आठवणी यानिमित्तानं ताज्या झाल्यायत. त्यावेळी हमखास मंगळवारीच खून व्हायचे, आणि आत्ताही मंगळवारीच दोन खून झालेत. त्यामुळे मंगळवार डोंबिवलीकरांसाठी धडकी भरवणारा ठरू लागलाय. शहरात सध्या सुरू असलेले अवैध धंदे, बेसुमार रेतीउपसा, त्यातून शहरात वाढलेला गुंडांचा वावर यामुळे आता डोंबिवलीची गुन्हेगारी शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागलीये. त्यात भर म्हणून डोंबिवलीत सध्याच्या घडीला ६६८ जणांकडे परवानाधारक बंदुका आहेत. या सगळ्यांना खरंच बंदुकांची गरज आहे का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 09:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close