डोंबिवली : खोणी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2017 10:48 PM IST

डोंबिवली : खोणी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

28 आॅगस्ट : डोंबिवलीच्या खोणी ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाचे हनुमान ठोंबरे निवडून आले आहेत.

खोणी ग्रामपंचायतीवर मागील २० वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. ११ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत शिवसेनेचे ६, तर भाजपचे ५ सदस्य होते. त्यात यंदाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्यांचं अपहरण, शिवसेनेच्या सदस्यांना जीवे मारण्याची धमकी आणि या सगळ्या आरोपांखाली भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि रंगतदार बनली होती.

संख्याबळाच्या तुलनेत शिवसेनेचं पारडं जड असलं, तरी आज सेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले, तर दोघांनी थेट भाजपलाच मतदान केलं. त्यामुळे भाजपाचे उमेदवार हनुमान ठोंबरे यांचा ७-२ अशा मोठ्या फरकाने विजय झाला. यानंतर मात्र पक्षभेद विसरून एकत्र काम करणार असल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात आलं.

विजय शेर्ये सद्यस, कार्यकर्ते आणि नगरसेवक महेश पाटिल यांना जाते असेही सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक महेश पाटील, डॉ.सुनिता पाटील, खुशबू चौधरी, साई शेलार,उपमहापौर मोरेश्वर भोईर, कल्याण सरचिटणीस शिवाजी आव्हाड, सुजित नलावडे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...