डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा खून

डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा खून

घरासमोर कचरा आणि कुत्र्याचे विष्ठा टाकण्याच्या वादातून एका महिलेचा शेजाऱ्याने डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केल्याची घटना घडली

  • Share this:

16 आॅगस्ट : घरासमोर कचरा आणि कुत्र्याचे विष्ठा टाकण्याच्या वादातून एका महिलेचा शेजाऱ्याने डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केल्याची घटना घडली. सुनंदा लोकरे असं या महिलेचं नाव आहे. आरोपी रवींद्र मसुरकरला पोलिसांनी अटक केलीय.

बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून काढलेला कचरा टाकण्यावरून सुनंदा आणि रवींद्र या दोघांत भांडण जुंपलं. हा वाद शेवटी विकोपाला गेला. रवींद्र याने घरातील लोखंडी रॉड आणून सुनंदा हीच्या डोक्यात उपट्या टाकल्या. परिणामी सुनंदा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हे पाहून हल्लेखोर रवींद्र याने तेथून पळ काढला.

शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत तिला पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तथापी तेथील डॉक्टरांनी सुनंदा हिला मृत घोषित केलं. दुसरीकडे पोलिसांनी फरार रवींद्र याला एका चाळीतून मुसक्या आवळून गजाआड केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 10:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...