डोंबिवलीत सेना-भाजपमध्ये धुसफूस सुरूच, सेनेकडून होर्डिंगबाजी

सत्ताधारी सेना-भाजप एकमेकांना डिवाचायला एक पण संधी सोडत नाही आहे. शिवसेनेने शहरात काही ठिकाणी निषेधाचे होर्डिंग लावले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 08:41 PM IST

डोंबिवलीत सेना-भाजपमध्ये धुसफूस सुरूच, सेनेकडून होर्डिंगबाजी

प्रदीप भणगे, डोंबिवली

12 मे : डोंबिवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी सेना-भाजप एकमेकांना डिवाचायला एक पण संधी सोडत नाही आहे. शिवसेनेने शहरात काही ठिकाणी निषेधाचे होर्डिंग लावले आहे.

भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी मात्र शिवसेनेवर हल्लाबोल केला असून आमच्या वाटेला गेलात तर यापुढे जशास तसं उत्तर मिळेल, असा इशारा दिलाय.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांना अपशब्द उच्चारणाऱ्या दानवे यांना विरोध करणं योग्यच आहे. शिवाय भाजप जर आम्हाला डिवचत असेल, तर यापुढे शिवसेना स्टाईलनेच उत्तर देण्यात येईल असा इशारा  शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख कविता चौधरी गावंड यांनी दिलाय.

दरम्यान, या प्रकरणी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह 4 जणांना आज दुपारी अटक केली आणि कल्याण कोर्टात हजर केले. कोर्टाने महेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...