डोंबिवलीत मनसेची स्मरणयात्रा, मुख्यमंत्र्यांसाठी दिले बदाम भेट

डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटाला एक वर्ष होत आले तरीही अद्याप शासनाने नुकसान भरपाई न दिल्याच्या निषेधार्थ डोंबिवली शहर मनसेतर्फे 'स्मरणयात्रा' मोर्चा काढण्यात आला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 3, 2017 07:23 PM IST

डोंबिवलीत मनसेची स्मरणयात्रा, मुख्यमंत्र्यांसाठी दिले बदाम भेट

प्रदीप भणगे, डोंबिवली

03 मे : ळएया स्फोटातील अनेक बाधित कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री केवळ आश्वासन देतात त्याची पूर्तता करीत नसल्याचे सांगत त्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मनसेने बदामाचे एक पाकीटही तहसीलदारांना भेट दिले.

डोंबिवलीत झालेल्या प्रोबेस कंपनीतील भयानक स्फोटाला येत्या 26 मे रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासकीय यंत्रणेकडून दुर्घटनाग्रस्तांचे 2 ते 3 वेळा पंचनामे करूनही हे नागरिक अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत आठवण करून देण्यासाठी मनसेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

तसेच मुख्यमंत्री अनेक वेळा आश्वासन देतात मात्र त्याची पूर्तता करीत नसल्याचे सांगत त्यांची स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी मनसेतर्फे तहसिलदारांना बदामाचे पाकीट भेट देण्यात आले.

तसेच 26 मे च्या पूर्वी या दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळल्यास यापेक्षा अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने यावेळी बोलताना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...