डोंबिवली MIDC मधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

डोंबिवली MIDC मधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

डोंबिवली MIDC मधील मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली भीषण आग संध्याकाळी उशीरापर्यंत धुमसत होती. आगीवर नियंत्रण मिळवलेलं असलं तरी परिसरातल्या नागरिकांना खबरदारी म्हणून हलवण्यात आलं आहे.

  • Share this:

डोंबिवली,18 फेब्रुवारी: डोंबिवली MIDC मधील मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली भीषण आग संध्याकाळी उशीरापर्यंत धुमसत होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीला आता NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. एमआयडीसी फेज 2 इथे लागलेली ही आग शेजारच्या कंपन्यांमध्येही पसरली. दुपारी 2 च्या सुमारास लागलेल्या या आगीवर सातच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यास जवानांना यश आलं. तरीही अजूनही आग पूर्णपणे विझलेली नाही. या परिसरात रात्री उशीरापर्यंत ज्वाळा दिसत होत्या आणि धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत पसरलेले होते. या आगीत जीवितहानी झालेली नाही.

या आगीमुळे परिसरात केमिकलमुळे दुर्गंधीही पसरली आहे. एमआयडीसीमधील फेज 2 मध्ये ही आग लागली आहे.  आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या वेळी केमिकल ड्रमसचे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. या रासायनिक पदार्थांमुळेच  आग आणखी पसरत आहे. आधी मेट्रो कंपनीला लागलेली आग शेजारच्या W18 कंपनीलाही लागली असल्याची माहिती मिळते आहे. आता डोंबिवली MIDC कडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

'कल्याण शीळ फाटा रस्ता वापरू नका'

कल्याण- शीळ फाटा रस्त्याचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. या आगीचा डोंबिवलीतून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शीळ फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंबिवलीमधील एका मेट्रोपॉलिटन केमिकल कंपनीत आग भडकली आहे. यात केमिकल ड्रमचे एकापाठोपाठ स्फोट होत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या परिसरात इतर कंपन्याही आहेत. तिथल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत.

'नागरिकांनी घराबाहेर पडावं'

MIDC परिसरात या केमिकल कंपनीजवळ राहणाऱ्या लोकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात येत आहे. आगीमुळे उठलेले धुराचे लोट प्रचंड आहेत. या दाट काळ्या धुरामुळे गुदमरायला होऊ शकतं. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतरावर आश्रय घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे. परिसरातल्या इतर कंपन्या आणि शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

MIDC परिसरातल्या शाळा आणि कंपन्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आग आणखी पसरत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातूनही धुराचे लोट दिसत आहेत. या आगीने नेमकं किती नुकसान झालं आहे. याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या कंपनीत कुणी अडकलं असण्याची शक्यता नाही. पण याचीही अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही. मुंबई, उपनगरं आणि परिसरात आगीचं सत्र सुरूच आहे.

मुंबईच्या GST भवनालाही लागली होती भीषण..

आदल्याच दिवशी मुंबईत माझगावच्या जीएसटी भवनाला मोठी आग लागली होती. जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. पाण्याच्या 20 बंबाच्या मदतीने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भवनामध्ये असलेली महत्त्वाची सगळी कागदपत्रं जळून खाक झाली असून सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.मोठी आणि जुनी इमारत असल्यामुळे चहुबाजूने आगीने वेढा घातला आहे. या इमारतीमध्ये काही सरकारी कार्यालयेदेखील आहेत. त्यात कार्यालयीन कामकाजाचा आठवड्याचा पहिला दिवस होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची वर्दळ ऑफिसमध्ये होती. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली.

वाचा : पुण्यातील कॉसमॉस बँकेवर Cyber Attack, पोलिसांना मिळालं मोठं यश

First published: February 18, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या