डोंबिवलीत एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच 5 एटीएम लुटले, 38 लाख लंपास

डोंबिवलीत एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच 5 एटीएम लुटले, 38 लाख लंपास

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनी यांना एक सिक्रेट कोड देते आणि राकेश पवारनं त्याच कोडचा वापर करत पाच एटीएमखाली केले.

  • Share this:

17 मे : एटीएममध्ये लाखो रुपये भरले जातात. ज्या कर्मचाऱ्यांवर पैसे भरण्याची जबाबदारी असते. त्यांनीच गोलमाल करुन 38 लाख लंपास केल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडलीये.

एटीएममध्ये पैसे भरता-भरता...एटीएम खाली करण्याचा भन्नाट प्रकार डोंबिवलीत घडलाय आणि एवढे-तेवढे नव्हे चक्क 38 लाख रुपयांनी एटीएम खाली केले. राकेश पवार, नयन भानुशाली आणि गुप्ता असं या कर्मचाऱ्यांची नावं आहे.

टीसीपीएल  ही कंपनी एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम करते. तर रोकड ने-आण करण्याच काम रायडर सेफगार्डही कंपनी करते.  या कंपनीत राकेश पवार काम करायचा. एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनी यांना एक सिक्रेट कोड देते आणि राकेश पवारनं त्याच कोडचा वापर करत पाच एटीएम खाली केले.

डोंबिवलीतल्या पाच एटीएमवर या भामट्यांनी डल्ला मारलाय. कुंपण शेत खातं म्हणतात ते हेच...ज्यांच्याकडे एटीएम भरण्याचं काम होतं त्यांनीच रिकाम केलं.

First published: May 17, 2017, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading