S M L

पुन्हा डोंबिवली ब्लाॅस्ट, प्रोबेस कंपनीजवळच स्फोट

डोंबिवलीमध्ये ज्या कंपनीत स्फोट झाला होता त्याच प्रोबेस कंपनीच्या बाजूला असलेली हारबर्ट ब्राऊनमध्ये छोटासा स्फोट झालाय.

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2017 07:07 PM IST

पुन्हा डोंबिवली ब्लाॅस्ट, प्रोबेस कंपनीजवळच स्फोट

30 आॅगस्ट : डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत ज्या कंपनीत स्फोट झाला होता त्याच प्रोबेस कंपनीच्या बाजूला असलेली हारबर्ट ब्राऊनमध्ये छोटासा स्फोट झालाय.

कंपनीत केमिकल मधील कामगार ड्रम खाली करत असताना केमिकलच्या रसायनांचा हवेतील प्राणवायू (ऑक्सिजन ) शी संपर्क झाल्याने छोटासा स्फोट झाला आणि कंपनी परिसरात धूर पसरला अशी माहिती सूत्रांनी दिली.

पण याबाबत अधिकृत माहीत कंपनीकडून किंवा एमआयडीसीकडून दिलेली नाही. स्फोटामुळे धूर झाल्याने कंपनीतील आणि आजू बाजूचे कंपनीतील कामगार भीतीने पळाले. त्याच प्रमाणे आजूबाजूच्या वस्तीत सुद्धा भीतीचे वातावरण पसरले पण  कोणत्याही प्रकारची प्राणहानी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 07:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close