डोंबिवली : चोळेगाव हत्येप्रकरणात एका तरुणाचं अपहरण ?

डोंबिवली : चोळेगाव हत्येप्रकरणात एका तरुणाचं अपहरण ?

इंटिरिअर ठेका हद्दीच्या वादातून घरात घुसून करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारामध्ये ठेकेदार किशोर किसन चौधरी याचा मृत्यू झालाय. या प्रकरणात एका तरुणाचं अपहरण झाल्याची बाबसमोर आलीये.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली

10 मे : घर दुरुस्तीच्या वादातून मंगळवारी झालेल्या हत्येप्रकरणाला आणखी एक वळण मिळालाय. या प्रकरणात आणखी दोन तरुणांना मारहाण झाल्याचं समोर आलंय. यातील एकाचं नाव महिमा दास असं आहे. तो कालपासून बेपत्ता असून त्याचं अपहरण झाल्याचा आरोप त्याच्या आईने केलाय.

ठाकुर्लीतील चोळेगावमध्ये घरातील इंटिरिअर ठेका हद्दीच्या वादातून घरात घुसून करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारामध्ये ठेकेदार किशोर किसन चौधरी याचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून आणखी दोघांना मारहाण झाल्याची बाबसमोर आलीय.

महिमा दास(19) हा तरुण कालपासून बेपत्ता आहे. या संदर्भात महिमा दासच्या आई अनथोनी अम्मा यांनी सांगितलं की, काल सकाळी साडेदहा वाजता महिमा हा मृत ठेकेदार किशोर चौधरी यांच्याकडे गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता असून मोबाईल पण बंद आहे.

त्याचा साथीदाराने दिलेल्या माहितीनुसार, महिमा आणि त्याला पण बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा पाय फॅक्चर झाला आहे, भीतीने तो नाव देण्यास तयार नाही. महिमा दासला खांद्याला गोळी लागली असून त्याला एका गाडीतून बेपत्ता करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या आईने केलाय.

यापूर्वीही महिमा दासच्या लहान भावाला याच भागात मारहाण करण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं. कालची घटना घडण्यापूर्वी दिलीप भोईर कंपनीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यासह ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडेही स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांनी तक्रार केलीये.

'घटनास्थळी 23 राऊंड फायर'

या संदर्भात  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार पवार यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. पण महिमा दासचं अपहरण झाल्याचं घटनेला दुजोरा दिला. तपासासाठी पाच पथक विविध ठिकाणी पाठवली आहेत. एका तरुणाला गोळी लागल्याचे मान्य केले आणि एकूण 23 राऊंड फायर झाल्याचे सांगितलं. ही हत्या नियोजन पूर्वक केली असून घरातील नातेवाईकांना इतरत्र पाठवण्यात आल्याचे उघड झालं आहे. जखमी झालेल्या त्या तरुणाने किशोर चौधरी यांना मारण्यासाठी 20 ते 25 जण आल्याचे सांगितलं.

डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कारकिर्दीत गुंडगिरी आणि गैरप्रकार वाढले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे,यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांची बदली करावी अशी मागणी केली आहे.

First published: May 10, 2017, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading