S M L

तिसऱ्या वर्षीही डोंबिवली जास्त गर्दीचं स्थानक

डोंबिवली रेल्वे स्थानक सलग तिसऱ्या वर्षी जास्त गर्दीचं स्थानक बनलंय.मध्य रेल्वेनं ही आकडेवारी दिलीये.

Sonali Deshpande | Updated On: Apr 8, 2017 01:50 PM IST

तिसऱ्या वर्षीही डोंबिवली जास्त गर्दीचं स्थानक

08 एप्रिल : डोंबिवली रेल्वे स्थानक सलग तिसऱ्या वर्षी जास्त गर्दीचं स्थानक बनलंय.मध्य रेल्वेनं ही आकडेवारी दिलीये. गर्दीच्या आकडेवारीत दिवा स्थानकाची आठव्या स्थानावर झेप गेलीय, तर विक्रोळी, बदलापूर या स्थानकांनाही डोंबिवलीनं मागे टाकलंय. ठाण्याची प्रवासी संख्याही दोन वर्षांत १६ हजारांनी वाढलीय.

दर दिवशीच्या प्रवासी संख्येच्या यादीत डोंबिवली सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर असल्याचे दिसते. २०१६-१७मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी २,४६,१६१ प्रवाशांनी प्रवास केला. त्या खालोखाल ठाणे स्थानकातील दर दिवशीची सरासरी प्रवासी संख्या २,४३,४२३ एवढी होती. मात्र २०१५-१६ या वर्षांशी तुलना केल्यास डोंबिवलीपेक्षा ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत जास्त वाढ झाली आहे. या दोन वर्षांमध्ये डोंबिवलीतील प्रवासी संख्या ८६३६ने वाढली, तर ठाणे स्थानकातील वाढ १२,२७० एवढी जास्त आहे.

या आकडेवारीनुसार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. २०१४-१५मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी १,६१,११३ प्रवासी प्रवास करत होते. २०१६-१७ या वर्षांत ही संख्या १,४१,३८७ एवढी आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात वाढलेल्या कॉर्पोरेट कंपन्या आणि सरकारी कार्यालयं, दक्षिण मुंबईतून या भागात स्थलांतरित होणारी कंपन्यांची कार्यालयं यांचा परिणाम या प्रवासी संख्येवर झाल्याचं निरीक्षण रेल्वे अधिकारी नोंदवतात.

विशेष म्हणजे या तीन वर्षांत प्रवासी संख्येत सर्वाधिक वाढही दिवा स्थानकातच झाली असून २०१४-१५च्या तुलनेत १७ हजार अधिक प्रवासी या स्थानकातून दर दिवशी प्रवास करत आहेत. त्या खालोखाल ठाणे स्थानकात १५,५९७ प्रवासी वाढले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close