डोंबिवलीत भाजप नगरसेवकाला मारण्यासाठी १ कोटींची सुपारी, आरोपीची कबुली

कुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची कबुली दरोडा प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका आरोपीनं दिलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 11:28 PM IST

डोंबिवलीत भाजप नगरसेवकाला मारण्यासाठी १ कोटींची सुपारी, आरोपीची कबुली

19 डिसेंबर : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची कबुली दरोडा प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका आरोपीनं दिलीये. यामुळे डोंबिवलीत मोठी खळबळ उडालीये.

कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये ऍडव्हान्सही घेतल्याची कबुली आरोपीने दिलीये.

डोंबिवलीतल्या एका बाहुबली नगरसेवकाने आपल्याला ही सुपारी दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडालीये. या आरोपीसह एकूण ६ जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केलीये. त्यांच्याकडून १ पिस्तुल, १ रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसं यासह ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केलीये. दरम्यान, पोलिसांनी आता या सुपारी प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 11:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...