मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन्स ?, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओत दिसणारा परिसर हा मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातला असल्याचं कळतंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2017 08:51 PM IST

मुंबईच्या समुद्रकिनारी डॉल्फिन्स ?, व्हिडिओ व्हायरल

20 डिसेंबर : मुंबईच्या समुद्रात डॉल्फिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओत दिसणारा परिसर हा मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातला असल्याचं कळतंय.

खोल समुद्रात आढळणाऱ्या डाॅल्फिन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतात गोड्या पाण्यातले डॉल्फिन आढळतात. मुंबई नजीकच्या समुद्रात आतापर्यंत जे डॉल्फिन आढळले आहेत ते मृतावस्थेत होते अशा घटना घडल्या आहेत. पण मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात डाॅल्फिन दिसल्याचा व्हिडिओ समोर आलाय.

मात्र या व्हिडिओची सत्यता आम्ही पडताळतो आहोत. मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना हे डॉल्फिन आजवर अनेकदा दिसल्याचा दावा मच्छिमार करतात. मात्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर हे सहसा दिसत नाहीत. त्यामुळे डाॅल्फिन दिसलेला व्हिडिओ खरंच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगतचा आहे का ? अशी शक्यताच धुसर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...