घाटकोपर दुर्घटना; श्वानाने वाचवले ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचे प्राण

घाटकोपर दुर्घटना; श्वानाने वाचवले ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचे प्राण

उदय आणि पिंकी या NDRFच्या बचाव पथकातील दोन श्वानांनी ढिगाऱ्याखाली असलेल्या दोन रहिवाशांना शोधून काढलं

  • Share this:

मुंबई, 26 जुलै : घाटकोपरमध्ये सिद्धी साई इमारत दुर्घटनेचं बचावकार्य अजूनही सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी NDRF पथकासोबतच श्वान पथकाचीही मदत घेतली जातेय. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. त्यापैकी दोन जण असेही होते की ज्यांचे प्राण NDRFच्या जवानांनी नाहीतर श्वान पथकाने वाचवलेत.

मंगळवारी दिवसभर बचाव कार्य चालू होतं. तेव्हा उदय आणि पिंकी या NDRFच्या बचाव पथकातील दोन श्वानांनी ढिगाऱ्याखाली असलेल्या दोन रहिवाशांना शोधून काढलं. या श्वानांच्या मेहनतीमुळे अखेर त्या दोन रहिवाश्यांचे प्राण वाचवण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत शोध कार्य करण्याचं करण्याचं खास प्रशिक्षण या श्वानांना देण्यात येतं असतं.

First published: July 26, 2017, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading