नालासोपाऱ्यात कुत्र्यांची दहशत; आईसह 1 महिन्याच्या चिमुकल्याचे तोडले लचके!

नालासोपाऱ्यात कुत्र्यांची दहशत; आईसह 1 महिन्याच्या चिमुकल्याचे तोडले लचके!

नालासोपाऱ्यातल्या राजमाता नगरमध्ये कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. इथल्या एका कुत्र्यानं एक महिला आणि तिच्या एका वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करत चिमुरड्याचे लचके तोडले आहेत.

  • Share this:

04 फेब्रुवारी : नालासोपाऱ्यातल्या राजमाता नगरमध्ये कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. इथल्या एका कुत्र्यानं एक महिला आणि तिच्या एका वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला करत चिमुरड्याचे लचके तोडले आहेत. मुलावर हल्ला करणारा कुत्रा सोसायटीतल्या विपिन करकेरा यांचा असल्याचं सोसायटीतले इतर रहिवासी सांगतायत. मात्र हा हल्ला रस्त्यावरच्या कुत्र्यांनी केला असल्याचं करकेरा यांनी म्हटलंय.

याप्रकरणी तुळीज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करून अटक केली जाईल असे पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी सांगितलं. विपिन करकेरा यांनी अनेक भटक्या कुत्र्यांना आणून एका रूममध्ये मोकळे सोडले आहे. हे कुत्रे सतत भुंकत असतात. त्यामुळे याठिकाणी दहशत पसरली असून धवलगिरी अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या पूर्वा पवार या त्यांचा मुलगा सार्थ याला ट्युशनवरुन घरी आणत असताना कडेवर असणाऱ्या १ वर्षाच्या यतार्थला कुत्र्याने चावाघेवून खेचले आणि लचके तोडू लागला. आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिची व मुलाची सोडवणूक केली.

या कुत्र्यांच्या त्रासाने लोक त्रस्त झाले असून अडीचशे कुटुंब दहशतीखाली वावरत आहेत. या कुत्र्यांना पाळण्याचे कोणतेही लायसन नाही. करकेरा दादागिरीच्या जोरावर हे मोकाट कुत्रे पाळत आहे.

या कुत्र्यांना जगण्याचा अधिकार नाही का ? जे कुत्रे अपंग आहेत त्यांच्यावर इलाज करून त्यांना पोसत आहे. ज्या कुत्र्याने चावा घेतला तो कुत्रा आमचा नसल्याचे करकेरा यांचे म्हणणे आहे.

First published: February 4, 2018, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading