कुत्र्याने कुत्रीला मारलं;वकिलाने मालकाला कोर्टात खेचलं

कुत्र्याने कुत्रीला मारलं;वकिलाने मालकाला कोर्टात खेचलं

कफ परेडच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या उच्च न्यायालयाचे वकील अॅड चिनॉय यांनी त्यांच्या कुत्रीच्या मृत्यू प्रकरणात शेजारी राहणाऱ्या जर्मन शेफर्डच्या मालकावर आणि त्याला सांभाळणाऱ्यावर गुन्हा दाखल केलाय.

  • Share this:

18 एप्रिल:  मुंबईत एका पाळीव कुत्रीच्या मृत्यूवरून तिच्या मालकानं दुसऱ्या कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल केलाय. उच्चभ्रू कफ परेड भागातली ही घटना आहे.

कफ परेडच्या एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या उच्च न्यायालयाचे वकील अॅड चिनॉय यांनी त्यांच्या कुत्रीच्या मृत्यू प्रकरणात शेजारी राहणाऱ्या जर्मन शेफर्डच्या मालकावर आणि त्याला सांभाळणाऱ्यावर  गुन्हा दाखल केलाय. जर्मन शेफर्ड  कुत्र्याचा मालक  आणि  हॅन्डलर जेव्हा त्याला लिफ्टमधून घेऊन जायला लागला तेव्हा त्याच लिफ्ट मधून बाहेर पडणाऱ्या कुत्रीवर त्यानं अचानक हल्ला केला. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या कुत्रीचा मृत्यू झाला. याला जबाबदार ठरवत अॅड. चिनॉय यांनी कुत्र्याचा मालक आणि त्याच्या हॅन्डलरच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आता याप्रकरणी कुत्र्याच्या मालकावर आणि  सांभाळ करणाऱ्याला काय शिक्षा होते आणि कोर्ट या साऱ्याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 09:12 PM IST

ताज्या बातम्या