ठाण्यानंतर कल्याणमध्येही कुत्र्याला कारखाली चिरडलं

ठाण्यानंतर कल्याणमध्येही कुत्र्याला कारखाली चिरडलं

ठाण्यात कारचालकानं कुत्र्याला चिरडल्याची घटना ताजी असताना आता कल्याणातही अशीच घटना समोर आलीये

  • Share this:

31 आॅक्टोबर : ठाण्यात कारचालकानं कुत्र्याला चिरडल्याची घटना ताजी असताना आता कल्याणातही अशीच घटना समोर आलीये. कल्याणच्या बिर्ला कॉलेजजवळील वाधवा संकुलात हा प्रकार घडलाय.

शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास वाधवा संकुलात एमएच ०५ सीएम ५९४ क्रमांकाची एक होंडा सिटी कार आली. या कारच्या चालकानं पार्किंगच्या परिसरात खेळत असलेल्या ३ कुत्र्यांच्या अंगावर गाडी घातली. यात एका कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कुत्रा जखमी झालाय. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला.

धक्कादायक बाब म्हणजे एका स्थानिक युवकानं 'पावा' प्राणीमित्र संघटनेच्या मदतीनं हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवला. मात्र, पोलिसांनी या युवकाला घाबरवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची माहिती या युवकानं दिली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

First published: October 31, 2017, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading