मुंबई, 23 मे : मुंबई उपनगरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच वेळी नुकत्याच आलेल्या चक्रीवादळात देखील उपनगरातील अनेक कोळीवाडा भागात आणि समुद्र किनारी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशा परिस्थितीत मुंबई शहर उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे पाहणी करायला बाहेर कुठे दिसत नाहीत अशी, टीका भाजपकडून करण्यात आली होती. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्याविरोधात केलेल्या टीकेला असंचं प्रत्युत्तर दिलं आहे.
'मी पर्यटनमंत्री जरी असलो तरी पर्यटन करण्याची मला हौस नाही. काही लोक फोटो काढण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी देतात. आमचा हेतू लोकांना मदत करण्याचा आहे आणि आम्ही मदत करीत असल्याने विरोधक निराश झाले आहेत. त्यामुळे त्यांनी टीका करत राहावी', असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आज उपनगरात एम एम आर डी ए कडून बांधण्यात येणाऱ्या मलाड कांजूरमार्ग या ठिकाणी असलेल्या covid सेंटरची पाहणी केली. मुंबई उपनगरातील एम एम आर डी ए यांच्याकडून बांधण्यात येणारे वेगवेगळे पूल रस्ते याची पाहणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली.
हे ही वाचा-पंतप्रधान भावूक झाले, हा ठरवून झालेला कार्यक्रम, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
मान्सूनपूर्व वेगवेगळ्या कामाचा आढावा देखील आदित्य ठाकरे यांनी घेतला. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, पुढील कालावधीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार लहान मुलांसाठी सेंटर उभे करत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलं बाधित होऊ नये अशी अपेक्षा जरी असली तरी तयारी करण्याच्या हेतूने महापालिका आणि राज्य सरकार सज्ज होत आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलांसाठी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध करून देणार आहेत. त्याचा देखील आढावा घेतला गेला आहे. उद्या वरळी शिवडी या भागातील एमएमआरडीएच्या वेगवेगळ्या कामांचा देखील आढावा घेतला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने मान्सून पूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या बैठकीचे आयोजन केल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले. एकूणच गुरूदत्तांच्या वेगवेगळ्या आरोपानंतर आदित्य ठाकरे मुंबई उपनगरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून होणारी टीका कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Corona patient