Home /News /mumbai /

पतीच्या पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचा अधिकार असतो का? उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पतीच्या पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचा अधिकार असतो का? उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला.

    मुंबई, 16 फेब्रुवारी : (Bombay High Court) मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला. दुसऱ्या पत्नीचा मृत व्यक्तीच्या निवृत्ती वेतनावर अधिकार असतो का? यावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सांगितलं की, मृत व्यक्तीच्या निवृत्ती वेतनावर त्याच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असू शकत नाही. कायदेशीरपणे पहिल्या लग्नातून विभक्त (घटस्फोट) न होता दुसरं लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीचा हक्क राहत नाही. न्यायमूर्ती एस जे कठवल्ला आणि न्यायमूर्ती जाधव यांच्या खंडपीठाने सोलापूर निवासी शामल ताटे यांची याचिका फेटाळली. या याचिकेत पेन्शनचा लाभ देण्यास सरकारच्या नकाराला त्यांनी आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ताटेचे पती महादेव सोलापुर जिल्हा कलेक्टर कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचं  1996 मध्ये निधन झालं होतं. महादेव यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा ते विवाहित होते. महादेव याच्या पहिल्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन झालं होतं. यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी ताटेने राज्य सरकारला पत्र लिहून महादेव यांची उर्वरित पेन्शन तिला देण्याची विनंती केली होती. हे ही वाचा-'माझे आदर्श नथुराम गोडसे' विषयावर स्पर्धा; अन् याच विद्यार्थ्याला पहिलं बक्षीस.. राज्य सरकारने चार याचिका फेटाळल्या.. बराच विचार विनिमय केल्यानंतर राज्य सरकारने ताटेकडून 2007 आणि 2014 दरम्यान आलेल्या याचिका फेटाळल्या. यानंतर ताटेंनी 2019 मध्ये उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. त्यांनी सांगितलं की, महादेवकडून त्यांना तीन मुलं असून समाजामध्ये या लग्नाबाबत माहिती आहे. त्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर हा त्यांचा हक्क आहे. मात्र न्यायालयाच्या उच्चतम न्यायालयाच्या विविध निर्णयांचा हवाला देत आपला निर्णय सुनावला. न्यायालयाने सांगितलं की, हिंदू विवाह अधिनियमअंतर्गत जोपर्यंत पहिल्या लग्नातून कायदेशीरपणे विभक्त होत नाही, तोपर्यंत दुसरं लग्न वैध मानलं जात नाही.
    First published:

    Tags: High Court, Mumbai, Mumbai high court

    पुढील बातम्या