खड्डे बुजवायला पैसे नाहीत का?, हायकोर्टाने सरकारला फटकारलं

खड्डे बुजवायला पैसे नाहीत का?, हायकोर्टाने सरकारला फटकारलं

राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीयेत, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे

  • Share this:

28 सप्टेंबर : राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीयेत, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे. इतकंच नाही तर खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत का ? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे.

राज्यभरात खड्ड्यांचं साम्राज्य असताना निष्क्रीय कारभार करणा-या राज्य सरकार ते ग्राम पंचायत अशा सगळ्यांवरच मुंबई हायकोर्टानं शाब्दिक फटकारे ओढले आहेत.

राज्यभरातील पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा, नगर पालिका आणि महानगर पालिकांनी खड्डे का बुजवले नाहीयेत याचं उत्तर द्यावं असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे. राज्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दखल मुंबई हायकोर्टाने स्वत: घेत सुओ मोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.

First Published: Sep 28, 2017 04:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading