मांस खाल्ल्याने कोरोनाची लागण होते का? पुण्यातील विभागाने दिलं उत्तर

मांस खाल्ल्याने कोरोनाची लागण होते का? पुण्यातील विभागाने दिलं उत्तर

समाज माध्‍यमावर (सोशल मीडिया) कुक्‍कुट मांस आणि इतर कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्‍त्रीय अफवा पसरविल्‍या जात आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : महाराष्‍ट्र राज्‍य कुक्‍कुटपालन व्‍यवसायामध्‍ये देशात अग्रेसर आहे. सन 2019 च्‍या पशुगणनेनूसार राज्‍यामध्‍ये एकूण कुक्‍कुट संख्‍या सुमारे 7 कोटी 42 लाख इतकी आहे. कुक्‍कुट पक्ष्‍यांमध्‍ये होणारे विविध रोग व त्‍याचे नियंत्रण करणे, हा सदर व्‍यवसायामध्‍ये यशस्‍वी होण्‍याचा सर्वात महत्‍त्‍वाचा मूलमंत्र आहे.

‘नोव्‍हेल कोरोना विषाणू’ प्रार्दुभावाच्‍या अनुषंगाने गेल्‍या काही दिवसांपासून समाज माध्‍यमावर (सोशल मीडिया) कुक्‍कुट मांस आणि इतर कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या आहारातील उपयोगाबाबत विविध अशास्‍त्रीय अफवा पसरविल्‍या जात आहेत. कुक्‍कुट पक्षी व कुक्‍कुट उत्‍पादने यांचा ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ प्रार्दुभावाशी कोणताही संबंध नाही. कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने मानवीय आहारामध्‍ये वापरण्‍यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्‍यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्‍या पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा व रोग अन्‍वेषण विभाग यांनी जारी केलेल्‍या परिपत्रकान्‍वये करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील कुक्‍कुट पालन व्‍यवसायाशी लाखो शेतकरी यांचे चरितार्थ व हित निगडीत आहेत. मका व सोयाबीन उत्‍पादक शेतकरी विशेषत: कुक्‍कुट पालन उद्योगाशी संलग्‍न आहेत. तसेच कुक्‍कुट व्‍यवसाय राज्‍याच्‍या विकासाशी जोडलेला आहे. कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांच्‍या सेवनामुळे मानवामध्‍ये ‘नोव्‍हेल करोना विषाणू’ संक्रमीत झाल्‍याचे संदर्भ नाहीत. आपल्‍याकडे चिकन व मटन उकळून शिजवून सेवन केले जाते व त्‍या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.

कुक्‍कुट पक्षामधील कोरोना विषाणू (इन्‍फेक्‍शीअस ब्रॉंकायटीस) मानवामध्‍ये संक्रमित होत नसल्‍याबाबत शास्‍त्रीय संदर्भ आहेत. तरी ग्राहकांनी समाज माध्‍यमांद्वारे प्रसारित किंवा फॉरवर्ड करण्‍यात येणाऱ्या चुकीच्‍या माहितीवर किंवा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. आपल्‍याकडील कुक्‍कुट मांस व कुक्‍कुट उत्‍पादने यांचा ‘नोव्‍हेल कोरोना विषाणू’ शी संबंध नाही व ती आहारात वापरण्‍यासाठी पूर्णत: सुरक्षि‍त आहेत, अशीही माहिती महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या पशुसंवर्धन आयुक्‍तालयाद्वारे देण्‍यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 16, 2020, 10:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading