जेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

जेजे हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप आज तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. जेजेमध्ये रूग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ओपीडी मात्र सुरू केली जाणार आहे.

  • Share this:

मुंबई,ता.21 मे : जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप आज तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. जेजेमध्ये रूग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ओपीडी मात्र सुरू केली जाणार आहे. शनिवारी जेजे रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली होती.

यासंबधी जेजे मार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यानं रविवारी वैद्यकिय शिक्षण सहसंचालक आणि निवासी डॉक्टरांची बैठक पार पडली. गिरीश महाजन यांनी देखील दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून संप मागे घेण्याचं आवाहन केलंय.

मात्र वारंवार डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याने ठोस कारवाई आणि उपायोजना कराव्यात अशी डॉक्टरांची मागणी आहे. सायन हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2018 09:19 AM IST

ताज्या बातम्या