मुंबई, 10 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput death Case) दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी सुशांतची पोस्टमार्टम रिपोर्ट तयार करणाऱ्या डॉ. आरसी कूपर रुग्णालयातील (Dr. R.C. Cooper Muncipal Hospital) डॉक्टरांच्या टीमची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्वामी पुढे म्हणाले की सुशांतचा मृतदेह रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार सुशांतचा एक पाय गुडघ्याखाली तिरका झाला होता. तो पाहताना तुटल्यासारखा वाटत होता. सुशांतचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट कूपर रुग्णालयातील 5 डॉक्टरांच्या टीमने तयार केला होता. रिपोर्टनुसार अभिनेत्याचा मृत्यू गळफास घेऊन श्वास गुदमरल्याने झाला आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटवर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कूपर रुग्णालयात यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या संशयास्पद मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आल्याची प्रतिक्रिया वापरकर्त्यांनी दिली आहे. काहींनी तर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत सत्य पडताळण्याचं आवाहन केलं आहे.
CBI will find it worthwhile to grill the Dr. R.C. Cooper Muncipal Hospital the five doctors who did the autopsy. According to the Ambulance staff that took SSR’s body to the hospital, SSR’s feet was twisted below his ankle (as if it was broken). Case is unravelling!!
सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह 14 जून रोजी त्याच्या फ्लॅममध्ये मिळाला
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या घरी मिळाला होता. गेल्या महिन्यात त्यांचे वडील केके सिंह यांनी पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतची कथिक गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात केस दाखल केली होती. ज्यानंतर पाटण्यातील पोलिसांची एक टीम या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आली होती. गेल्या आठवड्यात गुरुवारी केंद्राने बिहार सरकारच्या सीबीआयला सोपविण्यात आला आहे. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे.