मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नालासोपाऱ्यातील खाजगी रुग्णालयात 21 वर्षीय नर्ससोबत घृणास्पद कृत्य; आरोपी डॉक्टर फरार

नालासोपाऱ्यातील खाजगी रुग्णालयात 21 वर्षीय नर्ससोबत घृणास्पद कृत्य; आरोपी डॉक्टर फरार

Crime in Mumbai: नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग (Doctor Molest Nurse) केल्याची घटना समोर आली आहे.

Crime in Mumbai: नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग (Doctor Molest Nurse) केल्याची घटना समोर आली आहे.

Crime in Mumbai: नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग (Doctor Molest Nurse) केल्याची घटना समोर आली आहे.

नालासोपारा, 10 जुलै: नालासोपाऱ्यातील (Nalasopara) एका खाजगी रुग्णालयात (Private Hospital) डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग (Doctor Molest Nurse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी डॉक्टरनं रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे. या प्रकरणी पीडितेनं नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात विनयभंगासह धमकी देण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डॉ. सुशील मिश्रा असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. आरोपी डॉक्टर नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन युपी नाका परिसरातील आरती रुग्णालयात कार्यरत आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनरशिपमध्ये असून रुग्णालयाच्या मॅनेजमेंटचं काम पाहतो. याच रुग्णालयात काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सचा त्यानं विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

हेही वाचा-मुंबईत दिरानंच विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, धक्कादायक कारण आलं समोर

विनयभंग केल्यानंतर आरोपी डॉक्टर सुशील मिश्रा यानं पीडित नर्सला घटनेची वाच्यता न करण्याची धमकी देखील दिली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. पोलीस आरोपी डॉक्टरचा शोध घेत आहे.

हेही वाचा-स्वयंपाकाच्या बहाण्यानं घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; VIDEOही केला शूट

नागपूरात डॉक्टरचे 16 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

दुसऱ्या एका घटनेत, नागपूरातील सद्भभावनानगर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत (Minor girl) डॉक्टरनं अश्लील चाळे (Sexual molestation) केले आहेत. डॉक्टरनं पीडितेला सलाइन लावल्यानंतर काही वेळानं, तिच्याजवळ कोणी नसताना, तिच्याशी अश्लील चाळे केले आहे. याप्रकरणी 35 वर्षीय आरोपी डॉक्टरवर नागपूरातील नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai, Private hospitals, Sexual harassment