मुंबईतील डॉक्टरचा Corona मुळे मृत्यू, फेसबुकवर दिले होते मृत्यूचे संकेत

मुंबईतील डॉक्टरचा Corona मुळे मृत्यू, फेसबुकवर दिले होते मृत्यूचे संकेत

52 वर्षीय डॉक्टर महिलेने फेसबुकवर पोस्ट करत मृत्यूचे संकेत दिले होते. मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयामध्ये कार्यरत असणाऱ्या सीएमओ डॉक्टर मनीषा जाधव यांना कोव्हिडनं गाठलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: कोरोनाचा फटका (Increasing Corona Cases in India) ज्याप्रमाणे सामान्य माणसाला बसला आहे, त्याचप्रमाणे फ्रंटलाइनवर (Front-Line Workers) काम करणारे कर्मचारी अधिक धोका पत्करत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्याही अधिक आहे. अशीच मन हेलावून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. या 52 वर्षीय डॉक्टर महिलेने मरणापूर्वी फेसबुकवर पोस्ट करत मृत्यूचे संकेत दिले होते. त्या मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या. सीएमओ डॉक्टर मनीषा जाधव यांना कोव्हिडनं गाठलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील क्षयरोग रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. मनिषा जाधव यांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिवडीतील क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांना  कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या.

(हे वाचा-मोठी बातमी! चक्कर आल्याने एकाच दिवसात 11 जणांचा मृत्यू, नाशिकमधील घटनेने खळबळ)

ही होती शेवटची फेसबूक पोस्ट

हे उपचार सुरू असतानाच मनीषा यांनी फेसबुकवर गुड मॉर्निंगची पोस्ट टाकली होती आणि मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत देखील व्यक्त केली होती.

18 एप्रिल रोजी त्यांनी ही पोस्ट केली होती. या पोस्टनंतर जवळपास 36 तासानंतर सोमवारी 19 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी मृत्यूची पुसटशी कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या मित्र परिवारांमध्ये आणि सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 21, 2021, 10:40 AM IST

ताज्या बातम्या