मुंबईत डॉक्टरांच्या मुलाचं अपहरण, 8 तासानंतर समोर आला धक्कादायक खुलासा

मुंबईत डॉक्टरांच्या मुलाचं अपहरण, 8 तासानंतर समोर आला धक्कादायक खुलासा

तुमच्या मुलांना जर तुम्ही शाळेत पाठवलं असेल तर पालकांनो ही बातमी नक्की वाचा. कारण प्रश्न हा सुरक्षेचा आहे.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : तुमच्या मुलांना जर तुम्ही शाळेत पाठवलं असेल तर पालकांनो ही बातमी नक्की वाचा. कारण प्रश्न हा सुरक्षेचा आहे. नालासोपारा वालई पाडा येथील एका शाळेतून घरी बोलावलं असं सांगून दुपारी 2 वाजता शाळेतून एका डॉक्टरांच्या मुलाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तुला तुझ्या घरी बोलावलं आहे असं सांगत 5 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल 20 लाखांची मागणी केली. पण फक्त 8 तासाच पोलिसांनी आरोपींनी शोधून काढत मुलाची सुखरूप सुटका केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डॉ. सिध यांच्या पाच वर्षीय ईशानची 20 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलाची सुखरूप सुटका केली. तसेच यात त्यांनी तीन आरोपींना ताब्यातही घेतले आहे.

या प्रकरणात आणखीन पाच आरोपी असण्याची शक्यता असून यापैकी एक आरोपी डॉ. सिध यांच्या रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करीत होता. त्यांनेच त्याच्या मित्रांसह मुलाचं अपहरण केलं.

त्यामुळे तुमची मुलं जर शाळेत असतील तर शाळेच्या शिक्षकांशी ऐकदा नक्की बोलून घ्या. पालकांशी बोलल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेबाहेर सोडू नका.

कधी कॉमेडी तर कधी सिंघम, एकाच VIDEOमध्ये पाहा या दोन्ही स्टाईल

First published: November 25, 2018, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading