बेडशीट दिली नाही म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाचा डाॅक्टरांच्या सहायकावर कैची हल्ला

बेडशीट दिली नाही म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाचा डाॅक्टरांच्या सहायकावर कैची हल्ला

हल्ल्यात हा कर्मचारी गंभीर जखमी केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

13 मे : रुग्णाच्या नातेवाईकाला बेडशीट दिली नाही, याचा राग येऊन रुग्णाच्या नातेवाईकांने एका डाॅक्टरांच्या सहायकावर धार धार कैचीने हल्ला केला. या हल्ल्यात हा कर्मचारी गंभीर जखमी केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भायखळा इथल्या मध्यरेल्वेच्या डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर हाॅस्पिटलमध्ये, काल मध्यरात्री एका रुग्णाच्या नातेवाईकाने, रमेश पावरा या सहायक कर्मचाऱ्याला झोपण्यासाठी बेडशीट मागीतली. रमेश पावरा यांनी ती देण्यास नकार दिल्याच्या रागातून रुग्णाच्या नातेवाईकाने त्यांच्यावर धार धार कैचीने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात रमेश पावराच्या डोक्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्यात.

सध्या रमेश पावरावर आंबेडकर हाॅस्पिटलमध्येच उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ हाॅस्पिटलमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं असून या घटनेची भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका रुग्णांच्या चूकीमुळे इतर रुग्णांचे उपचार त्यामुळे थांबलेत. तसंच वारंवार हाॅस्पिटलमधल्या डाॅक्टरांवर, तिथल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नंही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 01:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading