मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शरद पवार नगर नकोच! मविआचा निर्णय शिंदे सरकार बदलणार?

शरद पवार नगर नकोच! मविआचा निर्णय शिंदे सरकार बदलणार?

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, नायगांव बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्पलेक्स नाव देण्याची मागणी केली

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, नायगांव बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्पलेक्स नाव देण्याची मागणी केली

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, नायगांव बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्पलेक्स नाव देण्याची मागणी केली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 जानेवारी : शिंदे सरकारने आता महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलण्याच्या शक्यता आहे. बहुचर्चित वरळी, नायगाव आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या नामांतरणाचा वाद आता पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे दिलेली नाव रद्द करण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारने वरळी बीडीडी चाळीला स्व.बाळासाहेब ठाकरे नगर, ना.म. जोशी मार्ग बीडीडी चाळीला स्व.राजीव गांधी नगर आणि नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर असे देण्याचे ठरवण्यात आले होते. याबाबत महाविकास आघाडी सरकारने शासन निर्णयही जाहीर केला होता.

महाविकास आघाडी सरकार असताना या तीनही पुर्नविकास प्रकल्पांचे नामांतरण झाले होते. मात्र वडाळा विधानसभेचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, नायगांव बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी कॉम्पलेक्स नाव देण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे येत्या काळात नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून हा पुनर्विकास नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे.

(लातूरचा 'प्रिन्स' लवकरच भाजपमध्ये? चर्चा वाढल्यानंतर अमित देशमुखांनी सोडलं मौन)

बीडीडीतील इतर संघटनांनी मात्र त्यावेळी नामकरणाला कडाडून विरोध केला होता. आता दिलेली नावे महान व्यक्तींची आहेत, मात्र तरीही बीडीडीत झालेल्या चळवळींशी, इतिहासाशी त्यांचा थेट संबंध नाही. त्यामुळे ही नावे बदलून वरळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर नाव द्यावे. तसंच इतर चाळींना छत्रपती शिवाजी महाराज नगर आणि महात्मा फुले नगर असे नाव द्यावे अशी मागणी केली होती.

तसंच त्याचवेळी श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, रणरागिणी अहिल्याताई रांगणेकर, एस. एम. जोशी, पी.के. कुरणे, प्रबोधनकार ठाकरे यांची नावेही त्यावेळी नामंकरणासाठी पुढे करण्यात आली होती.

(मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटाला लॉटरी! कुणाचा पत्ता कट होणार?)

मुळात पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर नामकरण करणे आवश्यक होते. त्यातही रहिवाशांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन नामकरण करणे गरजेचे होते. मात्र, असं न करता महाविकास आघाडी सरकारने परस्पर निर्णय घेतल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जाताच, आता युती सरकारकडून बीडीडी चाळीच्या नामकरण नव्याने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First published:

Tags: Sharad Pawar