चीनच्या हेकेखोरीला मुंबईतल्या शाळांचं उत्तर

चीनच्या हेकेखोरीला मुंबईतल्या शाळांचं उत्तर

भारत-चीन यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, चिनी बनावटीच्या शालोपयोगी वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात येणार आहे.

  • Share this:

10 जुलै : मुंबईतील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, यासाठी मुख्याध्यापक संघटनेने एक नवीन संकल्पना आणली आहे. भारत-चीन यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, चिनी बनावटीच्या शालोपयोगी वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन विद्यार्थी आणि पालकांना करण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यात अनेक शाळांमध्ये चीनमध्ये उत्पादित झालेल्या शालोपयोगी साहित्याचा वापर सर्रास केला जातो. सध्या भारत आणि चीन यांच्यातील संबंध बिघडले असून चीनचे सैन्य सातत्याने भारताची कुरापत काढत आहे. या पार्श्वभूमीवर, चिनी वस्तूंच्या खरेदीद्वारे चीनच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ न देता, भारतीय सैन्याच्या पाठीशी उभी राहण्याची गरज असल्याची भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे.

त्यानुसार यापुढे चिनी बनावटीच्या वॉटरबॉटल, डबा, कंपास, रंग, स्केचपेन, पट्टी, पॅड, रबर इत्यादी साहित्य विकत घेऊ नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2017 02:13 PM IST

ताज्या बातम्या