मुंबई

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

आता करा मज्जा! दिवाळीच्या सुट्टीत झाली मोठी वाढ, असं आहे नवं वेळापत्रक

आता करा मज्जा! दिवाळीच्या सुट्टीत झाली मोठी वाढ, असं आहे नवं वेळापत्रक

यापूर्वी केवळ पाच दिवस दिवाळीची सुट्टी मंजूर करण्यात आली होती या विरोधात शिक्षक संघटना आंदोलन करीत होत्या.

  • Share this:

मुंबई 06 नोव्हेंबर: दिवाळीसाठी राज्य सरकारने या आधी फक्त 5 दिवसांची सुट्टी (Diwali vacation) जाहीर केली होती. त्यानंतर शिक्षक संघटनांनी आंदोलन केलं होतं. शिक्षक आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने नवं परिपत्रक काढलं असून आता सुट्ट्यांचा कालावधी 5 वरून 13 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे Online अभ्यासाने कंटाळलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षक संघटनांची मागणी मान्य करत आता 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 13 दिवसांची दिवाळीची सुट्टी मान्य केल्याचं महाराष्ट्र शासनाने नव्या परिपत्रकात म्हटलं आहे.

यापूर्वी केवळ पाच दिवस दिवाळीची सुट्टी मंजूर करण्यात आली होती या विरोधात शिक्षक संघटना आंदोलन करीत होत्या.

कॉलेजेस केव्हा सुरू होणार?

राज्यात आता Unlockची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळे व्यवहार पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे कॉलेजेस (College) केव्हा सुरू होणार याविषयी सारखी विचारणा होत असते. सोशल मीडियावरही त्यावर चर्चा होत असते. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यावर आता महत्त्वाचा खुलासा केला आहे. कॉलेजेस केव्हा सुरू करावीत याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर सर्व विचार करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

BIG NEWS: शिवसेना आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र झालं रद्द

सामंत म्हणाले, दिल्लीत आणि केरळमध्ये दुसरी लाट आल्याचं सांगितलं जातेय. मात्र आपल्या राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. युजीसीने (UGC) गाईडलाईन्स दिल्या आहेत.

शासनाशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावेत असं युजीसी ने सांगितलं आहे. स्थानिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्या असंही त्यांनी सुचवलं आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ अशी माहितीही त्यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या